Supriya Sule
Supriya Sule Sarkarnama
पुणे

Future CM Posters : माझे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून पोस्टर्स लावणाऱ्यांना पोलिसांनी शोधावे : सुप्रिया सुळे

मिलिंद संगई

बारामती : ‘भावी मुख्यमंत्री’ असे माझे मुंबईत पोस्टर लावणाऱ्यांचा मुंबई पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. (Mumbai Police should find those who put up my posters : Supriya Sule)

बारामतीत दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी या सर्व प्रकारावर कमालीची नाराजी व्यक्त करताना माझे फोटो विनापरवानगी वापरण्याचा कोणालाही अधिकार नाही. एका महिलेचा फोटो पोस्टरवर कसा काय लावला जाऊ शकतो, हा अधिकार कोणालाच नाही, या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो असलेले पोस्टर मुंबईत लावण्यात आले आहेत. सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख पोस्टरवर करण्यात आला आहे.

'हे पोस्टर कोणी लावलं, याचा पुरावा असला पाहिजे. या देशात कोणालाही कोणाचेही पोस्टर लावता येणार नाही. एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे पोस्टर अथवा त्याचा फोटो मी पाहिलेला नाही. पण, हा प्रकारच अयोग्य असल्याची नाराजी त्यांनी बोलून दाखवली. माझा फोटो विनापरवानगी वापरण्याचा कोणालाही अधिकार नाही. उद्या तुमच्या कुटुंबातील पत्नी, मुलीचा असा फोटो लागला तर तुम्हाला चालेल का? असा सवाल त्यांनी केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार व माझे फोटो असलेले पोस्टर यापूर्वी लावण्यात आले होते. यामुळे अजितदादाचा आणि माझे फोटो कोण लावतंय, त्याच्या मागे कोण आहे? हे फोटो पहाटेच का लावले जात आहेत. कुठल्या पोलिसांनी त्याचा फोटो काढला. कुठे लावला गेला फोटो. याची चौकशी झाली पाहिजे. त्यातून आमचे खासगी आयुष्य, सुरक्षितता याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा राजकीय विषय नाही. पण याचा पोलिसांनी गांभिर्याने विचार करत संबंधिताचा शोध घ्यावा. मला मुंबई पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा', असेही त्या म्हणाल्या. पोस्टरवर कोणाचेच नाव नसल्याने पोलिसांनी हा विषय गांभिर्याने घ्यावा, असेही सुळे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT