Pune News : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रॉकफॉल प्रतिबंधात्मक कामाअंतर्गत बसविण्यात आलेल्या जाळीमध्ये अडकलेले दगड काढण्याचे काम उद्या (ता. 18) दुपारी 12 ते 2 या दरम्यान करण्यात येणार आहे. या कालावधीत द्रुतगती मार्गावरुन बोरघाट मार्गे प्रवास करणाऱ्या वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जड व अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. तसेच खालील प्रमाणे वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत.
बोरघाट मार्गे मुंबई वाहिनीवरील (Pune to Mumbai): कि.मी. क्र. 59.000 पासून सर्व जड-अवजड वाहनासांठी वाहतूक वरील कालावधीमध्ये पुर्णत: बंद राहील.
बोरघाट मार्गे पुणे वाहिनी वरील (Mumbai to Pune): कि.मी. क्र. 30/000 पासून सर्व जड-अवजड वाहनासांठी वाहतूक पुर्णत: वरील कालावधीमध्ये बंद राहील
पुण्याकडून मुंबईकडे जाणारी हलकी मोटार वाहने व बसेस / प्रवासी वाहने ही वाहतूक कि.मी. क्र. 59/000 पासून कनेकटींग लिंक मार्गे मुंबईकडे सुरु राहणार आहे.
मुंबईकडून पुण्याकडे जाणारी हलकी मोटार वाहने व बसेस / प्रवासी वाहने ही कि.मी. क्र 39/00 येथून कनेकटींग लिंक मार्गे पुणेकडे सुरु राहणार आहे.लोणावळा व खंडाळा येथून मुंबईकडे जाणारी हलकी मोटार वाहने व बसेस / प्रवासी वाहने तसेच जड-अवजड वाहने द्रुतगती वरील कि.मी. क्र. 45/00 येथे थांबविण्यात येतील.
वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करावे तसेच वरील कालावधी दरम्यान अडचण आल्यावर मदतीसाठी द्रुतगती मार्गाच्या नियत्रंण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 व महामार्ग पोलीस विभागाचा दूरध्वनी क्रमांक 9833498334 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे,अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.