पुणे : आय लव्ह पुणे, आय लव्ह स्वारगेट असे विद्युत बोर्ड लावून नगरसेवकांनी संकल्पनेच्या नावाखाली स्वतःचे नाव लावून चमकोगिरी केली. त्यासाठी पादचारी मार्ग, रस्त्यांवर अडथळा निर्माण केला. अनधिकृतपणे वीज जोड घेतला. यावर लाखो रुपयांचा चुराडा गेल्या पाच वर्षात झाल्यानंतर आता मात्र, त्यावर कारवाई केली जाणार आहे.
आकाशचिन्ह विभागाने याचे सर्वेक्षण करून ‘आय लव्ह’च्या ७३ बोर्डांची माहिती तयार केली आहे. पुढील तीन दिवसात हे सगळे बोर्ड हटवा असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. (PMC, NEWS)
पुणे शहरात मूलभूत समस्या कायम असताना, रस्त्यांची चाळण झालेली असताना, पाण्याचा, कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत असताना नगरसेवकांनी मात्र, याकडे दुर्लक्ष करत आपापल्या भागात ‘आय लव्ह’चे विद्युत बोर्ड लावण्यावर भर दिला. नगरसेवकांसाठी असलेल्या ‘स’ यादीतून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर २ लाखापासून ते १० लाखापर्यंत निधी खर्च करून चौकांमध्ये बोर्ड लावले. त्यावर संकल्पना म्हणून नगरसेवकांनी स्वतःचे नावही लावले. हे बोर्ड लावताना पादचारी मार्ग, रस्ते यावर लावण्यात आले. त्यासाठी पथ विभागाला, विद्युत विभागाला कोणतीही माहिती न देता परस्पर बोर्ड लावण्यात आले.
शहरात एखाद दुसऱ्या ठिकाणी नाही तर प्रत्येक महत्त्वाच्या चौकात आय लव्ह नावाने बोर्ड लावण्यात आले. त्यामुळे सुंदरतेत भर पडण्याऐवजी शहराचे विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. नागरिकांनीही पुणे महापालिकेकडे तक्रारी केल्या. त्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आकाश चिन्ह विभागाच्या मार्फत शहरातील ‘आय लव्ह..’ या बोर्डांची माहिती संकलित करण्यात आली.
तसेच तत्कालीन उपायुक्त यशवंत माने यांनी यासंदर्भातील अहवाल आयुक्तांना देऊन हे सर्व फलक बेकायदा असल्याचे त्यात नमूद केले. त्यानुसार आयुक्तांनी कारवाईचे आदेश जुलै महिन्यातच देण्यात आले होते. पण प्रशासनाकडून त्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याने अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी २१ सप्टेंबर रोजी कारवाईचे लेखी आदेश दिले. यामध्ये संबंधित क्षेत्रीय कार्यालय, आकाश चिन्ह विभाग, विद्युत विभाग, पोलिसांनी एकत्र कारवाई करण्याचे नमूद केले आहे.
अतिरिक्त आयुक्तांनी आदेश देऊनही गेल्या आठ दिवसात कारवाई झाली नाही. त्यावर क्षेत्रीय कार्यालयांकडून विद्युतचे कर्मचारी नाही. ही संयुक्त कारवाई असल्याने होणार आहे, असे सांगितले. मात्र, बोर्ड लावताना विद्युत विभागाची गरज क्षेत्रीय कार्यालयांना पडलेली नव्हती, त्यांना अंधारात ठेवूनच आय लव्हचे बोर्ड लावले. पण आता कारवाई टाळण्यासाठी विविध कारणे दिले जात आहेत.
दरम्यान, याबाबत बोलतांना पालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले की, ‘‘वाहतुकीला अडथळा ठरणारे, आकाशचिन्ह विभागाची, विद्युत विभागाची परवानगी न घेता उभारलेले आय लव्ह चे बोर्ड काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तीन दिवसात हे सर्व बोर्ड काढून टाकल्याचा अहवाल सादर केला जाईल. जे अधिकारी कारवाई करणार नाहीत, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.’’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
क्षेत्रीय कार्यालय निहाय बोर्डची संख्या
नगर रस्ता -२३
ढोले पाटील - ५
येरवडा - ५
शिवाजीनगर - ०
कोथरूड - २
औंध - २
सिंहगड रस्ता - ३
धनकवडी - १
वारजे -३
वानवडी - ४
हडपसर -१४
कोंढवा ५
कसबा-विश्रामबाग - १
भवानी पेठ -२
बिबवेवाडी - ३
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.