Nagarpanchayat Election Stay  Sarkarnama
पुणे

Nagarpanchayat Election Stay : 'मतदानाच्या एक दिवस आधी स्थगिती, डोकं ठिकाणावर...', एकनाथ शिदेंच्या शिलेदार प्रचंड चिडला

Nagarpanchayat Election Ravindra Dhangekar : 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने काही नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या असून नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Roshan More

Ravindra Dhangekar News : राज्य निवडणूक आयोगाने बारामती, फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती दिली आहे. तर, तळेगाव दाभाडे,लोणावळा,सासवड आणि दौंड मधील ही काही प्रभागातील जागांच्या निवडणुकाला स्थगिती दिली आहे. दोन डिसेंबरला या ठिकाणी मतदान होणार होते. पुणेसह राज्यात देखील काही ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, या जागांसाठीनिवडणूक प्रक्रिया 4 डिसेंबर पासून सुरू पुन्हा सुरू केली जाणार आहे.

स्थगिती दिलेल्या ठिकाणी 20 डिसेंबरला मतदान तर 21 डिसेंबरला होणार मतमोजणी होणार आहे. मात्र, दोन ठरलेल्या वेळेच्या दोन दिवसआधीच स्थगिती दिल्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे महागनर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाचे डोके ठिकाण्यावर आहे का...? असा सवाल केला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, मतदानाच्या एक दिवस अगोदर राज्यातील अनेक नगरपरिषद नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्याबाबत नोटीस निवडणूक आयोग जाहीर करत आहे.मुळात 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणे एवढी मोठी चूक निवडणूक आयोग कशी करू शकते..?

'बरं ही चूक लक्षात आल्यानंतर तातडीने निवडणुक प्रक्रिया थांबवण्याची गरज होती पण सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आणि ऐन निवडणुकीच्या एक दिवस अगोदर निवडणुका स्थगित करणे हे व्यवहार्य आहे का.. ? एखादा कार्यकर्ता आपल्या आयुष्याची जमा पुंजी लावून निवडणुक लढत असतो, समाजाचं चांगलं व्हावं या भावनेने निवडणूक लढत असताना त्याने आपले सर्वस्व पणाला लावलेलं असतं आणि अचानकपणे अशा पद्धतीने निवडणूक रद्द करणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्यायकारक आहे.', असे देखील ते म्हटले.

खर्च कोणाकडून वसूल करणार...

'राज्य निवडणूक आयोगाचा देखील मोठ्या प्रमाणात खर्च निवडणूक नोटिफिकेशन निघाल्यानंतर निवडणूक होईपर्यंत होत असतो हा खर्च राज्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रमुखांच्या पगारातून वसूल करण्यात का येऊ नये...? कारण ही सर्वस्वी आयोगाची चूक आहे याचा भुर्दंड करदात्यांच्या पैशावर का...? दर वेळेला कोर्टाने तुम्हाला झापणे आवश्यक आहे का...? तुमच्या मतदार याद्यांमध्ये घोळ, तुमच्या आरक्षणात घोळ, निवडणूक प्रक्रियेत घोळ.तुम्ही स्वतःहून चांगले काम नाही करू शकत का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

पुणे पालिकेत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली?

पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत देखील अशाच प्रकारच्या चुका, प्रभाग रचनेत आणि प्रभाग आरक्षण यामध्ये देखील चुका झालेल्या आहेत. वरवर 50% ची मर्यादा पाळल्याच दिसत असलं तरी जेव्हा प्रभागानुरूप आपण बघतो त्यावेळेस अशा प्रकारची मर्यादा पाळण्यात आलेली नाही, असा दावा देखील धंगेकर यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT