Chandrashekhar bawankule Sarkarnama
पुणे

Pune BJP: बावनकुळेंनी सांगितली महापालिका निवडणुकांची तारीख अन् कार्यकर्त्यांना दिले कामाला लागण्याचे आदेश

Chandrashekhar bawankule News : राज्यातील महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये, कामाला लागा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : राज्यातील महापालिका निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याचे भाकित भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल (ता.७) पिंपरी-चिंचवडमध्ये केले. त्यामुळे गाफील न राहता आतापासूनच जोमाने कामाला लागण्यास त्यांनी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.

दरम्यान, परवा (ता.१०) मतदान होत असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल, अशी दुसरी भविष्यवाणी बावनकुळे यांनी यावेळी केली. पक्षाची प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाल्याने आता पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाच नाही, तर राज्यातील ७५ जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने 65 वर्षात देश 15 व्या क्रमांकावर नेऊन ठेवला, असा आरोप त्यांनी यावेळी केला. मात्र, आता मोदींच्या नेतृत्वाखाली जगातील विकसित देशाच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी आला आहे. देशाचे भविष्य हे युवा वर्गावर अवलंबून असल्याने मोदींच्या नेतृत्वाखाली युवा वर्गाची एकजुट तयार करुन 2035 चा भारत हा विश्वगुरु बनविण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे, असे ते म्हणाले.

बावनकुळे हे काल उद्योगनगरीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी 'भाजयुमो'चे पिंपरी-चिंचवडकर प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे यांच्या माध्यमातून उद्योगनगरीत सुरु करण्यात आलेल्या १४ युवा वॉरियर्स शाखांचे रिमोटद्वारे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते.

भोसरीचे आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी पक्षनेते नामदेव ढाके, भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, माजी उपमहापौर शैलजा मोरे आदी यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी अनुप मोरेंच्या नेतृत्वाखाली युवकांची दुचाकी रॅली काढण्यात आली.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT