Murlidahr Mohol, Medha Kulkarni  Sarkarnama
पुणे

Murlidhar Mohol News : दशकांचे वितुष्ट संपुष्टात; मोहोळांनी घेतली मेधा कुलकर्णींची भेट

Political News :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यातूनच शनिवारी मोहोळ यांनी कुलकर्णी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे पाहायला मिळाले.

Sudesh Mitkar

Pune News : भाजपच्या कोथरूडमधील दोन दिग्गज नेत्यांमधील वर्चस्ववाद सर्वश्रुत आहे. खासदार मेधा कुलकर्णी आणि पुणे लोकसभेचे भाजपच्या अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यातील पक्षांतर्गत वाद खूप जुना आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यातूनच शनिवारी मोहोळ यांनी कुलकर्णी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे पाहायला मिळाले.

पुण्यात मुरलीधर मोहोळ व मेधा कुलकर्णी यांच्यात राजकीय वर्चस्वातून मतभेद असल्याचे लपून राहिलेले नाही. विधानसभा 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून या दोघांमधील सुप्त राजकीय संघर्ष टोकदार होत गेला. ( Murlidhar Mohol News )

त्यानंतर पक्षाच्या काही कार्यक्रमांतील निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याच्या घटनेवरून मेधा कुलकर्णी स्वपक्षातील नेत्यांवर नाराज होत्या. विशेषतः उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांच्यावर आगपाखड केली होती. त्यावरून मेधा कुलकर्णींच्या मनातील खदखद उघड झाली होती.

त्यानंतर भाजपने मेधा कुलकर्णींची नाराजी दूर करत त्यांची नियुक्ती राज्यसभेवर केली, तर दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. भाजपने दोघांना समान संधी दिली आहे.

त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी झाले गेले विसरून आता मोहोळ यांच्या लोकसभा प्रचारात सहभागी व्हायला हवे होते. अशी भावना भाजप कार्यकर्त्यांतून व्यक्त करण्यात येत होती. मात्र, भाजपच्याच नव्या खासदार मेधा कुलकर्णी मात्र दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत असल्याचे दिसून आल्या. त्यामुळे उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

औक्षण करत दिल्या शुभेच्छा

या चर्चांना विराम देण्यासाठी मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांची भेट घेतल्याचे पाहावयास मिळाले. या वेळी मेधा कुलकर्णी यांनी त्यांचं औक्षण करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी दोघांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे या दोघांतील वादावर येत्या काळात पडदा पडण्याची शक्यता आहे.

(Edited By : Sachin Waghmare )

R

SCROLL FOR NEXT