Pune District Sessions Court delivered its verdict in the Nasrapur rape and murder case, sentencing the convicted accused to death. The judgment marks a significant development in the high-profile crime case. Sarkarnama
पुणे

Nasrapur Murder Case : नसरापूरच्या चिमुकलीला अवघ्या 55 दिवसांत न्याय! भीमराव कांबळेविरुद्धचे सगळे आरोप सिद्ध : शिक्षेच्या सुनावणीची तारीखही ठरली

Pune Court Death Sentence Verdict : नसरापूर मध्ये महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे 2026 ला साडेतीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. आजोळी राहायला आलेल्या या मुलीला आरोपी भीमराव कांबळेने जवळच्या गोठ्यात नेलं होतं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली.

Jagdish Patil

Nasrapur Rape Murder Case : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यातील नसरापूरमधील चिमुकलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

या सुनावणीत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवलं आणि आरोपी भीमराव कांबळेला कोणती शिक्षा दिली जाणार याची सुनावणी २९ जूनला होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आता येत्या सोमवारी आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे. कोर्टाने आरोपीच्या गुन्ह्यांसाठी फाशीची, जन्मठेपेची आणि तिसऱ्या आजन्म कारावासाची तरदूत असल्याचं सांगितलं.

दरम्यान, कोर्टात न्याय‍धीशांनी आरोपी कांबळेलो "तू तो प्रसंग आठव आणि तुला काय शिक्षा द्यायची ते तूच सांग?" असा प्रश्न विचारला. त्यावर "मी त्या दिवशी तिला गाठीशेव खायला घेऊन गेलो आणि मी पाय घसरून पडलो तेव्हा तिच्या डोक्याला मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला ती रडत होती," असा नवा बनाव आरोपीने केला.

त्यानंतर कोर्टाने हा सर्व इतिहास असून तुझ्यावरचे गुन्हे सिद्ध झाले आहेत असं सांगितलं. या सर्व प्रकरणानंतर पुन्हा कोर्टात युक्तीवाद झाला. यावेळी सरकारी वकिलांनी नराधम आरोपीला मृत्यूदंड देण्याची मागणी केली. भीमराव कांबळेला त्याने केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसून तो दयेच्या लायकीचा नसल्याचं म्हणालं.

शिवाय यावेळी वकिलांनी ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला तिच्यावर त्याने ३९ मिनिटं घृणास्पद प्रकार केल्याचा युक्तीवाद केला. त्यामुळे भीमराव कांबेळेला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.

नेमकं प्रकरण काय?

नसरापूर मध्ये महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे 2026 ला साडेतीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. आजोळी राहायला आलेल्या या मुलीला आरोपी भीमराव कांबळेने जवळच्या गोठ्यात नेलं होतं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली.

मुलगी सापडत नाही म्हणून नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता तिचा मृत देह जवळच्या गोठ्यात आढळला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं तपासातून समोर आलं होतं. या घटनेचे पडसाद पुण्यासह संपूर्ण राज्यात उमटले होते.

त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातलं होतं. त्यानंतर हे प्रकरणाची सुनावणी जलदगतीने सुरू करण्यात आली. त्यानुसार आता प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने आता २९ जूनला शिक्षा सुनावणार असल्याचं जाहीर केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT