Koregaon Bhima inquiry commission Sarkarnama
पुणे

Bhima Koregaon case : भीमा कोरेगाव प्रकरणात वर्नोन गोंजाल्विस, अरुण फरेरा यांना जामीन मंजूर

Pune News : पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेचा कोरेगाव-भीमा प्रकरणाशी संबंध जोडत महाराष्ट्र पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Bhima Koregaon case : भीमा कोरेगाव प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपी वर्नोन गोंजाल्विस आणि अरुण फरेरा यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने या दोघांचा जामीन नाकारला होता. त्यानंतर या दोघांनी जामीनीसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी चार वर्षापूर्वी ठाण्यातून अरुण फरेरा आणि अंधेरी एमआयडीसीतून वर्नोन गोंजाल्विस यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांच्यावर ही कारवाई केली आली.

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेचा कोरेगाव-भीमा प्रकरणाशी संबंध जोडत महाराष्ट्र पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. 28 ऑगस्ट रोजी या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आणि नजरकैदेत ठेवण्यात आले.

हे सर्व कार्यकर्ते डावे आहेत आणि माओवादी विचारांकडे त्यांचा ओढा आहे, असा त्याच्यावर आरोप आहे. मोदी सरकारवर ते टीका करत आले आहेत.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT