NCP Politics Sarkarnama
पुणे

NCP Politics: राष्ट्रवादी दोन्ही गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली; आमदारकीचे डोहाळे? वडिलांच्या नावावर राजकारणात...

Rupali Chakankar Allegations Against Rohini Khadse: लोकसभा निवडणुकीत तुतारीचा प्रचार करण्याचे सोडून रोहिणी खडसे यांनी फक्त आणि फक्त भाजपचाच प्रचार केला,असा आरोप चाकणकर यांनी केला.

Mangesh Mahale

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली आहे. अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केल्यानंतर शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी जोरदार पलटवार केला आहे.

पहिले नगरसेविका व्हा!

रोहिणी खडसे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करणाऱ्या चाकणकरांना डिवचलं आहे. "रुपाली चाकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. पण त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं, सुप्रिया सुळे यांच्यामुळे त्यांना पदे मिळाली आहेत. सुप्रियाताईंमुळेच त्यांचे अस्तित्व आहे. त्यांना राज्य महिला आयोगाचे पद व अन्य पदे दिली नसती तर चाकणकर त्यांची ओळख निर्माण करु शकल्या नसत्या. पहिले नगरसेवक कसे होता येईल, याकडे लक्ष द्या, " असा सल्ला खडसे यांनी दिला आहे.

ती सीडी अजूनही बाहेर आली नाही...

रोहिणी खडसे यांच्यावर टीका करताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, "स्वतःचं कर्तुत्व नसताना फक्त वडिलांच्या नावावर राजकारणात पद मिळवलं, त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही. आमच्याकडे सीडी आहे असे सांगून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. ती सीडी अजूनही बाहेर आलेली नाही"

खडसेंनी केला भाजपचा प्रचार

"शरद पवार गटाकडून वडील विधान परिषदेचे सदस्य असतानाही भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने स्वतःच्या पक्षाला फसवणारे आणि इतरांवर टीका करणाऱ्यांची मानसिकता व बुद्धिमत्ता किती आहे, हे यावरून कळून येते. लोकसभा निवडणुकीत तुतारीचा प्रचार करण्याचे सोडून रोहिणी खडसे यांनी फक्त आणि फक्त भाजपचाच प्रचार केला,असा आरोप चाकणकर यांनी केला.

सुळेंवर काय म्हणाल्या होत्या चाकणकर?

उरणच्या पिडीतेवर एकही शब्द न बोललेल्या सुप्रिया सुळे दररोज अजितदादांवर अनेक विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असतात. तर लोकसभेत त्यांचा सेट केलेला नरेटिव्ह आता धूऊन निघाला आहे. त्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत, अशा पद्धतीचे विधानं करून माध्यमांसमोर जाण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीकास्त्र चाकणकर यांनी सुळेंवर डागले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT