Pune News : एकत्र राहिलेले दोन महिन्यांत एकमेकांचे राजीनामा मागायला लागलेत, त्यांचे काय चाललेय त्यांनाच माहिती, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदारांवर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोग आणि लोकसभा अध्यक्षांकडे निवेदने दिली आहेत. यावरून राजकारणही चांगलेच तापले आहे. यावर कपिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील तटकरेंची खासदारकी रद्द करण्याची सुप्रिया सुळेंनी मागणी केली आहे, तर सुनील तटकरेंनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे सुप्रिया सुळेंची तक्रार केली आहे. याबाबत भाजपाचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी ते कशासाठी राजीनामा मागताहेत हे मला माहीत नाही. मात्र, आता एकत्र राहिलेले दोन महिन्यांत एकमेकांचे राजीनामा मागायला लागलेत, असा चिमटा काढला.
दरम्यान, माझ्या डोळ्यांसमोर माझा मुलगा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा अजित पवार यांच्या मातोश्रींनी आज व्यक्त केली होती. यासंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, लोकशाहीमध्ये कोणीही कोणतेही पद मिळवण्यासाठी इच्छा व्यक्त करू शकतो. प्रत्येक आईला माझा मुलगा मोठा व्हावा, असे वाटत असते. पण त्यांना काय वाटतं काय नाही, त्याचे उत्तर शेवटी तेच देऊ शकतात. मी भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. आमच्या नेत्याने अनेकदा सांगितले प्रत्येक पक्षाला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला त्यांच्या नेत्याने मुख्यमंत्री व्हावे, असे बोलण्याचा अधिकार आहे. देशात लोकशाही आहे.
केंद्र सरकारने कांद्याचे भाव कमी होण्यासाठी निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये कांदा वितरण सुरू केलंय, परिणामी राज्यातला कांदा उत्पादकाचं नुकसान झालं आहे. याबाबत बोलताना कपिल पाटील यांनी राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका हा विषय घेऊन कधीच प्रधानमंत्री मोदीजी काम करत नाहीत. 2014 ला नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं, की माझं सरकार गरिबांप्रति समर्पित आहे. गरिबांसाठी त्यांनी अनेक योजना आणल्यात. गरिबांच्या प्रति समर्पित सरकार चालवणारे पंतप्रधान नव्हे तर प्रधान सेवक नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे कांद्याचे भाव कुठे कमी केले, कुठे वितरित केला निवडणुका आहेत तिकडे वितरित केला, तसं नाही तर वितरण संपूर्ण देशासाठी आहे , यामुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान झाले ,शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल याचा निश्चितपणे सरकार विचार करेल असे सांगितले.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.