Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : मुख्यमंत्रिपदाचा निर्णय कधी घेणार, निवडणूक कोणाच्या नेतृत्त्वाखाली लढणार? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

सागर आव्हाड

Pune News, 17 Sep : राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे केलं जात आहे.

तर शरद पवार गट आणि काँग्रेसकडून मात्र याबाबत सावध भूमिका घेतली जात आहे. असंच काहीसं चित्र महायुतीमध्येही आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत भाष्य केलं आहे.

"पहिल्यांदा महायुतीच सरकार आणण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही सर्वजण बसून मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेऊ. तसंच आताची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे.

पुण्यातील (Pune) गणेश विसर्जन मिरवणुका सुरु होण्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा करून आरती केली. त्यानंतर आखील मंडई मंडळात देखील अजितदादांनी आरती केली.त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले, "राज्यातील जनतेने अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पांचं स्वागत केलं आणि आज बघता बघता अकरावा दिवस उजाडला आहे. आज गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणण्याची वेळ आली आहे. थोडंसं मन जड झाल आहे. आतापर्यंत सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. विसर्जनाच्या दिवशी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडावी."

यावेळी पत्रकारांनी महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत विचारलं असता ते म्हणाले, सर्वच कार्यकर्त्यांना वाटत असते की आपला नेता हा मुख्यमंत्री व्हावा, पण सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हावी असं होत नाही. मुख्यमंत्री पदाबाबत 145 चा मॅजिक आकडा पार करावा लागतो. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मतदार राजाच्या हातात असतं की कोणाला मतदान करायचं.

पहिल्यांदा महायुतीच सरकार आणण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही सर्वजण बसून मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेऊ. आताची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT