Sharad Pawar, Girish Bapat Latest Marathi News Sarkarnama
पुणे

पवारसाहेब, काकडेंना कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद देऊ नका! बापटांची गुगली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे पुणे शहराचे खासदार गिरीश बापट रविवारी एकाच व्यासपीठावर होते.

सरकारनामा ब्युरो

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे पुणे शहराचे खासदार गिरीश बापट रविवारी एकाच व्यासपीठावर होते. निमित्त होते, बापटांचे मित्र व राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे. यावेळी बोलताना बापटांनी आपल्या मित्राचे कौतुक करताना अनेकदा चिमटेही काढले. पण आमदारकीवरून थेट पवारांना विनंती करत टोलाही लगावला. (NCP Chief Sharad Pawar Latest Marathi News)

अंकुश काकडे यांच्या 'हॅशटॅग पुणे' या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी शरद पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात झाले. यावेळी खासदार बापट (Girish Bapat), वंदना चव्हाण, श्रीनिवास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बापटांनी आपल्या भाषणाची सुरूवातच काकडेंना पोपट म्हणत केली. मी बापट असलो तरी तो पोपट आहे. तो पोपटासारखा गोडगोड बोलतो, असा चिमटा काढत बापटांनी बोलतो चांगला तसा लिहितोही चांगला, ते ह्या पुस्तकावरून दिसते, असं कौतुकही केलं. (BJP MP Girish Bapat Marathi News )

आमदारकीच्या मुद्यावर बोलताना बापटांनी खोचक टोला लगावला. बापट यांनी शरद पवार यांना विनंती केली की, काकडे यांना काहीही द्या पण भगतसिंह कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद देऊ नका.' बापटांच्या या टोलेबाजीमुळं सभागृहात हशा पिकला. बापटांच्या या विधानामागे मागील दोन वर्षांपासून राज्यपालांकडे रखडलेल्या बारा जणांच्या नावांचा संदर्भ आहे. यावरून महाविकास आघाडी विरूध्द राज्यपाल असा संघर्ष सर्वपरिचित आहे.

दरम्यान, बापटांनी इतर मुद्यांवरून सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं. राजकारण हाच व्यवसाय बनल्याची सध्याची स्थिती आहे. अटल बिहारी वाजपेयी पुलाचे नाव दिलं, पण खाली संकल्पनेला दुसऱ्याचे नाव असते. संकल्पना म्हणजे काय हे मला समजतच नाही, असं सांगत बापटांनी भाजपच्याच नगरसेवकांना खडेबोल सुनावले. आजकाल सुशिक्षित लोकं मतदान करत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पुण्यात अनेक प्रश्न गंभीर आहेत. पुण्याचा प्राणी प्रश्न मोठा आहे. पण याची चर्चा सभागृहात होत नाही. आपल्या आंदोलनातून लोकांचा फायदा होईल अशी आंदोलन झाली पाहिजेत. आपली प्रसिद्धी होईल म्हणून आंदोलन करू नये, असं बापट म्हणाले. पुण्यातल्या गणेशोत्सव ला चांगलं स्वरूप आलं आहे. उत्सवात रक्तदान शिबीरं होतात. आधी वर्गणीसाठी दादागिरी चालायची, असं बापट यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT