Sharad Pawar News update
Sharad Pawar News update Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : 'लोक माझे सांगाती'तून पवारांनी ठाकरेंच्या आरोपांमधील हवाच काढली..; ठाकरे गटाला उघडं पाडलं..

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar slams Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले. या सुधारित आवृत्तीत काही नव्या घटना, प्रकरणे जोडण्यात आली आहेत.

या पुस्तकातील नवीन प्रकरणामुळे अनेक विषयांवर चर्चा सुरु झाल्या आहेत. पवारांनी अजित पवार-फडणवीस यांचा शपथविधी, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता यावर सविस्तर भाष्य केलं आहे. या नेत्यांचे कान टोचले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, तसेच ठाकरेंच्या विविध विषयावरील भूमिकांवर पवारांनी निशाणा साधला आहे. "संघर्ष न करता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला," असेही पवारांनी 'लोक माझे सांगाती'मध्ये नमूद केले आहे. ठाकरे गटाच्या अशा अनेक विषयांची पवारांनी स्पष्टपणे भूमिका मांडल्याने ठाकरे गट उघडा पडला आहे.

..हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो

मुंबईतील 'वज्रमूठ सभे'मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार केला होता. गेली अनेक वर्षे हा मुद्दा शिवसेनेच्या प्रचारामध्ये कळीचा असतो. मात्र, पवार यांनी पुस्तकात या दाव्याच्या विपरित भूमिका घेतली आहे. यावर पवार यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे की मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो'

उद्धव ठाकरेंच्या मर्यांदांवर पवार म्हणतात..

  • बाळासाहेबांसमवेतची संवादातील सहजता उद्धव यांच्याशी बोलताना नव्हती. मुख्यमंत्री असताना त्यांचे मंत्रालयात फक्त दोनदा जाणे आमच्या फारसे पचनी पडणारे नव्हते'

  • ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेतच वादळ माजेल याचा आम्हाला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडले,

  • संघर्ष न करता उद्धव यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला'

शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्ववादावर पवार म्हणाले...

  • महाविकास आघाडी आकाराला येताना शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववाद मारक ठरेल, अशी भीती काहींना होती.

  • शिवसेनेच्या बाबतीत माझे मत ऐकाल तर, हा पक्ष वेळोवेळी कितीही जोरकसपणे भूमिका मांडो, त्यांचा वैचारिक पाया तितका भक्कम नाही.

  • शिवसेनेच्या पूर्वेतिहासावर नजर टाकली तर राजकारणासाठी लागणारी लवचिकता त्यांनी वारंवार दाखविली आहे'

    (Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT