Pimpri-Chinchwad sarkarnama
पुणे

पिंपरीत पावणेदोनशे कोटीच्या कामात भाजपचा स्मार्ट भ्रष्टाचार!

शहरात नव्याने सीसीटीव्ही बसविण्याचा पावणेदोनशे कोटी रुपयांचा आता वादात सापडला आहे.

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जवळ आल्याने पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेची स्थायी समिती आता शेकडो कोटी रुपयांची उड्डाणे भरु लागली आहे. गेल्या बैठकीत तिने २०७ कोटींचे प्रस्ताव मंजूर केले. त्यात एकच विषय हा शहरात नव्याने सीसीटीव्ही बसविण्याचा पावणेदोनशे कोटी रुपयांचा आता वादात सापडला आहे.

सीसीटीव्ही सर्व्हेलन्सच्या या कामाची निविदा संशयास्पद असून सत्ताधाऱ्यांचा स्मार्ट भ्रष्टाचाराचा हा प्रयत्न असल्याने या कामासाठी कार्यादेश देऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष संजोग वाघेरे‌ पाटील (Sanjog Waghere) यांनी केली आहे. त्यामुळे या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, असे पत्र त्यांनी राज्याचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.

सदर निविदेतील पाच निविदाधारकांपैकी तिघांना विविध कारणांसाठी अपात्र ठरविण्यात आले व नंतर मे. मेट्रिक्सला हे काम देण्यात आले. तीन निविदाधारक अपात्र होणे आणि पात्र दोन निविदाधारक कंपन्यांच्या दरामधील मोठी तफावत यामुळे ही निविदा पूर्णतः संशयास्पद असल्याचे वाघेरे यांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT