Sharad Pawar, Atul Benke, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

NCP Crisis And Atul Benke : साहेब की दादा ? अतुल बेनकेंचे तळ्यात-मळ्यात; 'असा' घेणार निर्णय ?

NCP Split In Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेस एक रहावी अशीच कार्यकर्ता म्हणून भूमिका

गणेश कोरे

NCP MLA In Pune District : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. ते रविवारी (ता. २ जुलै) सुमारे ३५ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर आठ आमदारानींही मंत्रीपदाची शपथ घेतली. (Latest Political News)

पुणे जिल्ह्यात २१ पैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आमदार आहेत. यातील काही आमदारांनी आपली भूमिका घेतली आहे. मात्र जुन्नरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. सध्या ते तळ्यात-मळ्यात करत असल्याचे दिसून येत आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर झालेल्या शपथविधी कार्यक्रमात जुन्नरचे आमदार अतुल बेनके राजभवनात उपस्थित होते. मात्र त्यांनी अद्याप आपण शरद पवार यांच्यासोबत आहोत कि, अजित पवार यांच्यासोबत याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ, तरुण कार्यकर्ते, सहकारी व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल.

अजित पवार यांनी बोलविलेल्या बैठकीला बेनके उपस्थित होते. पक्षाची बैठक झाल्यानंतर ते राजभवनात गेले. दरम्यान या सर्व अभूतपुर्व नाट्यानंतर शरद पवार यांनी अनेक आमदारांनी आपल्याला फोन करून आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगत, या राजकिय नाट्यावर चार पाच दिवसांत चित्र स्पष्ट होईल असे सांगितले आहे.

जुन्नरचे आमदार अतुल बेनके कोणासोबत जाणार या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. बेनके यांचे वडील वल्लभ बेनके या तीन वेळा जुन्नरचे आमदार राहिलेले आहेत. ते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. तर त्‍यांच्‍यानंतर अतुल हे आमदार म्हणून निवडून आले. ते ही शरद पवार समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र आजच्या राजकीय नाट्यानंतर त्यांनी सबुरीची भूमिका घेतली आहे.

आपल्या भूमिकेबाबत 'सरकारनामा'शी बोलताना अतुल बेनके म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब आहे. शरद पवार साहेब व अजितदादा हे आमचे नेते आहेत. या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे. सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकत्र राहावे अशी माझी भूमिका आहे. जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ, तरुण कार्यकर्ते, सहकारी व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT