Supriya Sule  Sarkarnama
पुणे

Supriya Sule: लोकसभेला बारामतीतून विरोधात उमेदवार कोण असणार...? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या...

Ajit Pawar and Supriya Sule: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेला बारामतीची जागा लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.

Ganesh Thombare

चैतन्य मचाले :

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यापासून बाजूला होत आपला वेगळा गट स्थापन करणाऱ्या अजित पवार यांनी आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटातील आमदार, नेते आक्रमक होत शरद पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत कडक शब्दात टीका करत आहेत.

लोकसभेला बारामतीची जागा लढविणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पवार विरूद्ध पवार असा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामतीमधून उमेदवार नक्की कोण असेल, याबाबत आपल्याला माहिती नाही. पण आधी लोकसभा निवडणुका तर जाहीर होऊ द्या, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्या पडलेल्या दोन गटांमुळे पक्ष विभागला असून आता अजित पवार गटातील नेत्यांनी आक्रमक होत शरद पवार यांच्यावर आरोप करून टीकेची झोड उठविण्यास सुरूवात केली आहे. मात्र, या आरोपांना फारसे महत्व न देता आपल्या पक्षाचे काम अधिक चांगल्या पद्धतीने सुरू ठेवा, अशा सूचना शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. रविवारी झालेल्या शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेमध्येही याचा प्रत्यय आला.

अजित पवार यांनी केलेले वक्तव्य पहिल्यांदाच ऐकल्याचे सांगत पवार यांनी कोण काय टीका करते हे लोकांना बरोबर समजते. त्यामुळे अशा टीकांकडे फारसे लक्ष देत नसल्याचे पवार यांनी सांगितले होते. हीच भूमिका खासदार सुळे (Supriya Sule) यांनी कायम ठेवली.

त्या म्हणाल्या, "अजित पवार यांनी जी टीका केली त्यावर मला कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. मी माझा पक्षाला आणि कुटुंबाला बांधील आहे. पवार साहेबांसारखे कमी बोलणे गरजेचे आहे. आपल्या नेत्याने स्पष्टीकरण दिल्यानंतर आपण बोलणे योग्य नाही".

बारामतीमधून उमेदवार देणार असल्याची घोषणा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे, यावर बोलताना सुळे म्हणाल्या, "मला माहिती नाही माझ्यासमोर कोण उमेदवार आहे. आधी निवडणुका तर जाहीर होऊ द्या, मग उमेदवार कोण हे समजेल. काहीही होऊ द्या हेडलाईन ही नेहमी शरद पवार यांच्यावरच होते. जी काही भाषणे झाली त्यात 70 टक्के टीका शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर होती. यामध्ये विकासाचा काहीच मुद्दे नसतात. पॉलिसी काहीच सांगितली जात नाही", असे सुळे म्हणाल्या.

(Edited by- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT