Pune News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी दुसरा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन झाले आहे.
शांतीलाल सुरतवाला (वय ७६) यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली. गेल्या काही महिन्यापासून ते कँन्सरशी झुंज देत होते. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे निकटवर्तीय, गणेश मंडळातील सक्रिय कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या शांतीलाल सुरतवाला यांच्या निधनाने पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. आनंद ऋषीजी ब्लड बँकचे ते संस्थापक होते.
१९७९ मध्ये त्यांनी पुण्यातील सिटी पोस्ट वॉर्डातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि जिंकली.येथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. १९७९ ते २००७ या प्रदीर्घ काळात नगरसेवक आणि महापौर अशी जबाबदारी त्यांनी सांभाळली.
गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांचा शहरात मोठे सामाजिक वजन होते. शरद पवारांनी स्वतःहून महापौरपदाची जबाबदारी त्यांना दिली होती. महापौर असताना त्यांनी पुण्यात विविध कल्पना राबवल्या, त्या यशस्वी केल्या.
१९९२ ते १९९३ या कालावधीत शांतीलाल सुरतवाला यांनी पुण्याचे महापौर पद भूषवले होते. एक संयमी, अभ्यासू आणि विकासकामे करणारा नेता हरपल्याची भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील रस्ते धुण्याची अभिनव योजना त्यांनी यशस्वी केली होती. कात्रज तलावाच्या पाण्याने शहरातील प्रमुख १२ रस्ते महापालिकेचे कर्मचारी धुवायचे. त्यामुळे प्रदुषण कमी होत असे. खड्डे, आणि वाहतूक कोंडी या प्रमुख समस्या त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.