Pune News : विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यानंतर सातत्याने अजित पवार आणि शरद पवार हे नेते पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतांवर चर्चा करण्यात येत आहेत.
दोन्ही गटातील बहुतांश नेत्यांना हे दोन्ही नेते एकत्र येतील अशी शक्यता वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या नेत्या आणि माजी खासदार वंदना चव्हाण यांनी या सगळ्या शक्यता खोडून काढल्या आहेत. दादा आणि साहेब एकत्र येणं अशक्य असल्याचे देखील त्यांनी नमूद केला आहे.
पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना वंदना चव्हाण म्हणाल्या, कुटुंब हे एकत्र होतं सध्या त्यांच्यामध्ये फाळणी झाली असली तरी हे कुटुंब एकत्र यावं असं वाटणं वावगं नाही. मात्र सध्या जो राष्ट्रवादीचा (NCP) दुसरा गट आहे. तो एका वेगळ्या विचारधारे सोबत गेला आहे. त्या विचारधारेची जुळून घेणे आमच्यासाठी अशक्य गोष्ट असून आम्ही आयडिओलॉजीशी कॉम्प्रोमाइज करू शकत नसल्याने दोन्ही गट एकत्र येणं अशक्य असल्याचं वंदना चव्हाण यांनी सांगितलं.
वंदना चव्हाण पुढे म्हणाल्या जे नेते आयडियलॉजी वर ठाम नसतील ज्यांचा बेस पक्का नसेल ते नेते कदाचित त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार असतील मात्र आम्ही आयडॉलॉजिकली स्ट्रॉंग असल्याने कोणतीही अमिश दाखवली तरी आम्ही तसा विचार करू शकत नाही. अस वंदना चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
सत्तेत राहण्यासाठी काहीजण अजित पवार यांच्यासोबत विचारात आहेत का? असं विचारलं असता वंदना चव्हाण म्हणाल्या, सत्तेमध्ये राहिल्यानंतर आपण काम करू शकतो असं काही जणांना वाटत आहे. ते अत्यंत चुकीचा आहे. सत्तेत नसताना देखील तुम्ही लोकांची काम करू शकता हा शरद पवार यांच्यासोबत असलेल्या प्रत्येकाचा ठाम विश्वास आहे. शरद पवार यांच्या रूपाने आम्हाला मोठं व्हिजनरी नेतृत्व मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वातच आम्ही यापुढे काम करू असं वंदना चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.