Sharad Pawar on Mahayuti Sarkarnama
पुणे

NCP on Mahayuti : सरकारची ‘कामे कमी आणि नखरे जास्त’ राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याकडून महायुती सरकारवर टीकास्त्र

Mahayuti government criticism : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 'या' नेत्याकडून महायुती सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

Sudesh Mitkar

Rohit Pawar : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर शनिवारी सायंकाळी यादी ही जाहीर झाली. मात्र, हा घोळ काही अद्यापही संपलेला नाही असं चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. राज्य सरकारच सामान्य प्रशासन विभागाने रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याबाबत सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे. या सोशल मीडिया पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले ,या सरकारची ‘कामे कमी आणि नखरे जास्त’ अशीच काहीशी स्थिती आहे. तिन्ही पक्षांना त्यांना स्वतःला अनपेक्षित बहुमत मिळूनही निकालानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी १२ दिवसांनी, मंत्रिमंडळ विस्तार २२ दिवसांनी, खातेवाटप ३० दिवसांनी तर पालकमंत्री वाटप तब्बल दोन महिन्यांनी झाले. त्यातही आता रायगड, नाशिकच्या पालकमंत्री वाटपावरून वाद निर्माण झाल्याने २४ तासाच्या आत सरकारला नवीन GR काढावा लागला. अशी टीका रोहित पवार यांनी केली.

सरकारमध्ये एकीकडे कोण आंदोलन करतंय तर कोण नाराज होऊन गावाला जातंय, तर दुसरीकडे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री दावोसला सुद्धा एकत्र जात नाहीत. शिवाय उद्योगमंत्र्यांची दावोसची हॉटेल रूमसुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाने बुक केली. एवढी टोकाची अनागोंदी आणि अविश्वास या सरकारमध्ये आहे.

आज सरकार स्थापन होऊन ४६ दिवस झालेत पण जनतेला सरकार किंवा मंत्र्याची कामे कुठेही दिसत नाहीत परंतु गुन्हेगारी मात्र सर्वत्र वेगाने वाढताना दिसत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये, युवांना रोजगार या आश्वासनांचा सरकारला बहुधा विसर पडला असावा. या सगळ्या अविश्वासू वातावरणात आपापसातले हेवेदावे बाजूला सारून सरकारने जनहिताची कामे करावीत, ही लोकांची अपेक्षा सरकार पूर्ण करेल की नाही, हा आज प्रश्नच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT