Rupali Patil
Rupali Patil Sarkarnama
पुणे

करारा जवाब मिळेल! रुपाली पाटलांचं जगदीश मुळीकांना आव्हान

सरकारनामा ब्युरो

पुणे : भाजप (BJP) नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात काल (ता.16) जोरदार राडा झाला. या वेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे (Vaishali Nagawade) यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांना खुलं आव्हान दिलं आहे.

रुपाली पाटील म्हणाल्या की, हे सगळे विकृत लोक आहेत. आपण काय बोलतो हे देवेंद्र फडणवीसांनाच कळत नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं का, घोषणाबाजी करा अन् मार खा? स्वत:च्या बायकोला कोण बोललं तर हे इतरांना पुढ करतात. मग इतर महिलांना मारहाण होते तेव्हा काय? आता गुन्हा दाखल झाला असून, ही सुरवात आहे. जगदीश मुळीकांचं आव्हान आम्ही स्वीकारलंय. त्यांना करारा जवाब मिळेल. आम्ही कुठ यायचं ते त्यांनी सांगाव. महिलांवर हात उचलणं ही त्यांची संस्कृती आहे. आम्ही त्यांना सोडणार नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमात काल हा राडा झाला. या कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या होत्या. हा कार्यक्रम सुरु होण्याआधीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिरात बसले होते. त्यानंतर स्मृती इराणी बोलायला उठल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना भाजपच्या एका कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यामुळं चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर बोलताना नागवडे म्हणाल्या होत्या की, मेरिएट हॉटेलला आम्हाला स्मृती इराणींना भेटू दिलं नव्हतं. त्यामुळं आम्ही बालगंधर्व रंगमंदिरात शेवटच्या रांगेत जाऊन बसलो. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर आम्हीही राष्ट्रवादीच्या घोषणा दिल्या. यानंतर भाजपमधील पुरुष कार्यकर्ते आले आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला. पोलिसांनाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी जुमानलं नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT