Mahesh Kothe  Sarkarnama
पुणे

Mahesh Kothe Passes Away: कुंभमेळ्यात शाही स्नान केल्यानंतर हृदयविकाराचा झटका; सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन

Solapur Ex Mayor Mahesh Kothe Death : सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र,त्यांचा पराभव झाला होता.

Mangesh Mahale

Solapur News :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे (वय ५५) यांचे निधन झाले. आमदार देवेंद्र कोठे हे त्याचे पुतणे होत. शरद पवार यांचे निकटवर्तिय म्हणून महेश कोठे यांची ओळख होती.

महेश कोठे यांचे हृदयविकराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. कुंभमेळाच्या निमित्ताने प्रयागराज येथे गेल्यानंतर हृदयविकाराचा धक्का आल्याची प्राथमिक माहिती आहे. सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र,त्यांचा पराभव झाला होता.

प्रयागराज येथे ते मित्रांसोबत कुंभमेळ्यात शाही स्नान करून बाहेर पडले. थंडीमुळे रक्त गोठल्याने त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सोलापुराच्या राजकारणातील दिग्गज नेते असलेल्या महेश कोठे याचा राजकीय प्रवास हा काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असा होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांनी नुकतीच सोलापूर उत्तर विधानसभा लढवली होती. सोलापुरातील विविध सामाजिक संस्थांमध्ये ते सक्रिय होते. सोलापूरचे सर्वात तरुण महापौर अशी ओळख होती.

राजकीय प्रवास

  • सोलापूर महापालिकेचे महापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते होते.

  • महेश कोठे यांनी 2021 मध्ये शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

  • राष्ट्रवादीतील फुटीनंतर महेश कोठे शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. ,

  • सोलापूर उत्तर मतदारसंघातून महेश कोठे हे विजय देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते.

  • चार ते पाचवेळा विधानसभा निवडणूक लढवली पण त्यांना अपयश आले

  • सोलापूर महापालिकेच्या राजकारणात त्यांचे वर्चस्व होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT