NCP leaders sarkarnama
पुणे

भाजपवाल्यांना पवार कुटुंबियांचे कामच उत्तर देईल! राष्ट्रवादीचे नेते आक्रमक

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण बारामती (Baramati) दौऱ्यावर येणार आहेत

सरकारनामा ब्यूरो

Baramati : माळेगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्काराने पंतप्रधान गौरवितात. त्यांचेच भाजप (BJP) पक्षाचे नेते बारामतीत येऊन सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत करण्याची भाषा करतात. बारामतीला मंजूर झालेला पाचशे कोटींपेक्षा अधिकचा विकास निधी भाजपने थांबवून येथील जनतेला विटीस धरले आहे. त्यांनीच बारामती जिंकून दाखवू अशी गर्जना करायची, अशा दुटप्पी भूमिकेला बारामतीमधील जनता बळी पडणार नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला.

भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीची पुढील लोकसभा निवडणूक भाजप जिंकणार अशी घोषणा केली होती. त्यावरुन माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, संचालक योगेश जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. धुमाळवाडी-भिकोबानगर (ता.बारामती) येथे मुख्यमंत्री सडक योजनेतून सुमारे ९ कोटी ५३ लाख रुपये खर्च होणाऱ्या सहा कि.मी. रस्त्याचा शुभारंभ आज (ता. ६) झाला.

ऊस उत्पादकांना प्रतिटन ३१०० रुपये दर जाहिर केल्याने माळेगाव साखर कारखाना प्रशासनाचा सन्मान योगेश जगताप मित्रमंडळाने केला. त्या प्रसंगी माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, संचालक योगेश जगताप, राष्ट्रवादीचे संभाजी होळकर, माळेगावचे उपाध्यक्ष सागर जाधव, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, तानाजी कोकरे, अॅड. केशवराव जगताप, अरविंद जगताप, दत्तात्रेय येळे, बाळासाहेब कोकरे, अमरसिंग जगताप, शिवाजी टेंगले, रोहित कोकरे, दशरथ धुमाळ, सरपंच कविता सोनवणे, अतुल जगताप आदी उपस्थित होते.

दरम्यान, कोल्हापूर भागात यंदा तीन हजार रुपयांपेक्षा कमी ऊस दर जाहिर झाला, याकडे लक्ष वेधत तावरे म्हणाले, ''माळेगावच्या संचालकांनी अजितदादांच्या नेतृत्वाखाली यंदा ३१०० रुपये अंतिम ऊस दर जाहिर केला. पश्चिम महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. मात्र, येथील काही विरोधकांनी आनखी तीनशे रुपये प्रतिटन अधिकच्या दराची मागणी केली, हे किपतप योग्य आहे, असेही ते म्हणाले. आरेला कारे म्हणून कारखान्याचे अथवा सभासदांचे हित होणार नाही. ऊस दर देताना संस्थेची अर्थिक घडीसुद्धा सुस्थितीत राहिली पाहिजे, असेही त्यांनी विरोधकांना सुनावले.

भिकोबानगर-धुमाळवाडी-माळेगाव या सहा किलोमिटरच्या रस्त्यासाठी तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साडेनऊ कोटी रुपये मंजूर केले होते. ऐवढेच नाही, तर त्यांनी माळेगाव कारखान्याच्या कार्यस्थळाला जोडणारे सर्व रस्ते अद्ययावत करण्याचा गतवर्षी दिलेला शब्द यानिमित्ताने पुर्णत्वाला आला, असेही तावरे यांनी सांगितले. नीरा डावा कालव्याच्या अस्तरिकणाचा विषय शेतकऱ्यांचा विरोध डावलून हाताळला जाणार नाही, असे आश्वासन खुद्द अजित पवार यांनी दिल्याची माहिती संभाजी होळकर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर जगताप यांनी केले, तर आभार संग्राम जगताप यांनी मानले.

पवार कुटुंबियांचे कामच देईल भाजपला उत्तर...!

योगेश जगताप म्हणाले, बारामतीचा सर्वांगिण विकास पवार कुटुंबियांनी केल्याचे वास्तव चित्र आहे. हे भाजपचे वरिष्ठ नेतेच जाहिररित्या बोलून दाखवितात. त्यामुळे दिल्ली, मुंबईचे भाजपच्या नेतेमंडळींनी कितीही बारामती दौरे केले तरी पवार कुटुंबियांचे कामच त्यांना उत्तर देईल, असेही जगताप यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT