Ashok Pawar
Ashok Pawar Sarkarnama
पुणे

Sugar factory election : राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांच्या पॅनलची विक्रमी विजयाकडे आगेकूच

सरकारनामा ब्यूरो

Sugar factory election : शिरूर (Shirur) तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा (Ghodganga) सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) संचालक मंडळासाठी (ता. ६ नोव्हेंबर) ७१. ६६ टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज सुरु आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने आघाडी घेतली आहे.

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने विक्रमी मताने विजयाकडे वाटचाल सुरू केले आहे. सर्वपक्षीय किसान क्रांती पॅनलचा दारूण पराभव पत्करावा लागत आहे.

फक्त किसान क्रांती पॅनलचे पॅनल प्रमुख दादापाटील फराटे यांचा निसटत्या 155 मताने विजय झाला आहेत. ऊस उत्पादक गट क्रमांक एक मांडवगण फराटा :संभाजी फराटे ७१८०( विजय) दादासाहेब फराटे ६९३८ (विजय)- किसान क्रांती पॅनल. दिलीप फराटे -६७८४, बाळासाहेब फराटे -५८६६ मतांनी पराभूत झाले.

गट क्रमांक दोन इनामगाव : सचिन मसाले -7768, नरेंद्र माने -7452, दोघेही विजयी, तात्या घाडगे- ५९३८, मच्छिंद्र थोरात -5755 (दोघेही पराभूत ) गट क्रमांक. तीन वडगाव रासाई ॲड. अशोक रावसाहेब पवार-८१४२ विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. उमेश सुदामराव साठे-7409 मताने विजय, वीरेंद्र शेलार 5744, सुभाष शेलार 5417 दोघेही पराभूत झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने पाच जागा विक्रमी मताने जिंकत विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. मताचा फरक पाहता शेतकरी विकास पॅनलचे 19 उमेदवार विजय होतील, अशा प्रकारचे सध्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल व भाजपसह विरोधकांच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनेल मध्ये सरळ सामना रंगला. त्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) याचे पॅनल बाजी मारताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT