Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Rohit Pawar Video Goes Viral : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकडून रोहित पवारांचा Video होतोय व्हायरल : काय आहे प्रकरण ?

सरकारनामा ब्यूरो

Rohit Pawar On Competitive Examination Fees : राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तलाठी परीक्षा शुल्कावरून शिंदे-फडणवीस-पवार सरकारला जाब विचारला. याची चर्चा सध्या समाज माध्यमांवर सुरु आहे. विधीमंडळातील रोहित पवारांचा हा व्हिडिओ विद्यार्थ्यांंकडून व्हायरल होत आहे.

रोहित पवारांनी विधानसभेत स्पर्धा परीक्षा शुल्काचा मुद्दा उपस्थित केला. विविध स्पर्धा परीक्षा शुल्काच्या (Competitive Examination Fees) माध्यमातून सरकार, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या कमाई करत असल्याची आरोप नेहमी होत असतो.

विद्यार्थ्यांची फसवणूक..

युपीएसकडून (UPSC) परीक्षा शुल्क म्हणून शंभर रुपये, एमपीएससी (MPSC) कडून साडेतीनशे रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परिक्षांसाठी केवळ 600 रुपये शुल्क आकारते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांची कशी फसवणूक करीत आहे, त्यावर रोहित पवारांनी नाराजी व्यक्त करीत संताप व्यक्त केला आहे.

आमदार होऊन करायचं काय?

"राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी नऊशे-हजार रुपये शुल्क का आकारते. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार होऊन करायचं काय?" असा सवाल रोहित पवारांनी सभागृहात उपस्थित केला.

सरकारच्या तिजोरी 127 कोटी जमा ...

तलाठी पदासाठी नुकतेच अर्ज मागवण्यात आले होते. यात खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात आले. या शुल्कासाठी महिन्याभरातच सरकारकडे 12 लाख 77 हजार 100 अर्ज आले आहेत. ज्याची एकूण शुल्क रक्कम तब्बल 127 कोटी रुपये हे सरकारच्या तिजोरी जमा झाले आहेत.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT