Sunil Shelke Sarkarnama
पुणे

Sunil Shelke: अजितदादांचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्या कटप्रकरणी एसआयटीची स्थापना

NCP MLA Sunil Shelke murder conspiracy case: आरोपी मध्यप्रदेश, जालना, वडगाव, काळेवाडी परिसरातले असून आमदार शेळके यांचे कोणतेही वैयक्तिक वैर त्यांच्याशी नव्हते. त्यामुळे या गुन्हेगारांच्या पाठीमागे कोणी शक्तिशाली सूत्रधार असल्याचा संशय शेळके यांनी विधानसभेत व्यक्त केला.

सरकारनामा ब्यूरो

  1. आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड झाल्यामुळे प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.

  2. 2023 मध्ये तळेगाव दाभाडे परिसरात मोठी कारवाई करून सात गुन्हेगारांना अटक केली होती, ज्यांच्याकडून नऊ पिस्तुलं जप्त केली होती.

  3. आरोपींना वैयक्तिक वैर नसतानाही एवढा मोठा कट रचला गेला असल्याने मागे शक्तिशाली सूत्रधार असल्याचा संशय शेळके यांनी विधानसभेत व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना वर्षभरापूर्वी जिवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबतचे आदेश दिले आहे. आपल्याला मारण्याचा कट रचण्यात आला होता, असा प्रश्न सुनील शेळके यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.

२६ जुलै २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडाविरोधी पथकाने गुप्त माहितीनुसार तळेगाव दाभाडे परिसरात मोठी कारवाई केली होती. एकूण सात सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती ज्यांच्याकडून नऊ पिस्तूल, ४२ जिवंत काडतुसे, कोयते अशा प्राणघातक शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला होता.

तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली होती. या गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर आमदार सुनील शेळके यांची हत्या करण्यासाठीच होणार होता, असा खुलासा त्यांच्याकडून जबाबामध्ये समोर आला होता. हे आरोपी मध्यप्रदेश, जालना, वडगाव, काळेवाडी परिसरातले असून आमदार शेळके यांचे कोणतेही वैयक्तिक वैर त्यांच्याशी नव्हते. त्यामुळे या गुन्हेगारांच्या पाठीमागे कोणी शक्तिशाली सूत्रधार असल्याचा संशय शेळके यांनी विधानसभेत व्यक्त केला. पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा तपास केला जाणार आहे.

त्यानंतर एसआयटीची स्थापन करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या पथकाची स्थापना केली आहे. यामध्ये सहाय्यक आयुक्त विशाल हिरे यांच्यासोबत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात, सहाय्यक निरीक्षक हरिश माने, अंबरीश देशमुख आदींचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी पकडलेली टोळी ही गरीब आणि सामान्य कुटुंबातील असूनही त्यांच्याकडे नऊ पिस्तूल, कोयते खरेदी करण्यासाठी लाखोंचा खर्च झाला. एवढेच नव्हे तर, ज्या नामांकित वकिलांनी आरोपींची बाजू घेतली त्यांच्या फीही लाखोंच्या घरात होती. मग या सगळ्यांमागे “हे पैसे कोण पुरवतंय?”, आणि “माझ्या हत्या कटामागचा सूत्रधार कोण?”, असा थेट सवाल शेळके यांनी उपस्थित केला होता.

4 FAQ

Q1. सुनील शेळके प्रकरणात SIT का स्थापन करण्यात आली?
हत्येच्या कटामागील सूत्रधाराचा सखोल तपास करण्यासाठी SIT स्थापन झाली.

Q2. पोलिसांनी गुन्हेगारांकडून काय जप्त केले?
नऊ पिस्तुलं, ४२ जिवंत काडतुसे, कोयते आणि इतर प्राणघातक शस्त्रं जप्त झाली.

Q3. आरोपी कोणत्या भागातील होते?
हे आरोपी मध्यप्रदेश, जालना, वडगाव आणि काळेवाडी परिसरातील होते.

Q4. तपास कोणाच्या नेतृत्वाखाली होणार आहे?
पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तपास होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT