Supriya Sule News, NCP News, Political News
Supriya Sule News, NCP News, Political News sarkarnama
पुणे

Supriya Sule : तुमचे प्रश्न थेट लोकसभेत विचारणार : सुळेंचा नवा उपक्रम

सरकारनामा ब्युरो

पुणे : जनतेचे प्रश्न संसदेत ठामपणे मांडण्यासाठी राष्ट्रवादी (ncp) काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. सुळे यांनी 'सक्रिय सहभाग आणि संवाद: लोकाभिमुख संसदीय कामकाजासाठी' या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. (Supriya Sule latest news)

या उपक्रमा अंतर्गत नागरिकांना आपल्या समस्या किंवा सूचना सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत फक्त एका क्लिकवर पोहोचवता येणार आहेत.(Political News)

जनतेचे प्रश्न लोकसभेत मांडताना जनतेचा सहभाग आणखी वाढावा यासाठी त्यांनी हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत नागरिक आपले प्रश्न, विषय, सुचना 'आस्क मी डॉट सुप्रिया सुळे डॉट नेट' ( https://askme.supriyasule.net ) या वेबसाईटवरुन थेट सुळे यांच्यापर्यंत पाठवू शकतात.

वेबसाइट ओपन केल्यानंतर नागरिकांना एक फॅार्म भरावा लागेल. फॅार्ममध्ये आपली माहिती आणि प्रश्न सविस्तर लिहिल्यानंतर प्रश्न पाठवता येणार आहे. त्यांनंतर तो प्रश्न सुळे यांच्यापर्यंत पोहोचल्याचा एक एसएमएस देखील नागरिकांना मिळणार आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "जनतेचे प्रश्न संसदेत ठामपणे मांडण्यासाठी आपल्याला जनता निवडून देत असते. जनतेचा सहभाग यात वाढला पाहिजे या विचाराने हा एक नवीन उपक्रम सुरु केला आहे,"

"यात स्वयंसेवी संस्था, नागरिक त्यांचे प्रश्न विचारू शकतात. त्यातील महत्त्वाचे मुद्दे, सूचना,विषय मी संसदेत मांडण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यामुळे नागरिकांनी आपले प्रश्न मांडावेत शिवाय या संवादाला आणखी मजबूत करण्यासाठी नागरिकांच्या अन्य काही सूचना असतील तर त्यांचेही स्वागत आहे," असे सुळे म्हणाल्या.

सुळे यांनी लोकसभेत वेळोवेळी आपल्या मतदारसंघासह देशातील अनेक जनहिताच्या विषयांवर आवाज उठवला आहे. लोकसभेतील त्यांची कामगिरी नेहमीच अव्वल ठरली आहे. त्यामुळे त्यांना अनेकवेळा संसदरत्न या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT