Rupali Chakankar and Amol Mitkari feature in NCP’s latest list of star campaigners, while Rupali Thombare’s exclusion fuels new party tensions within Ajit Pawar’s faction. Sarkarnama
पुणे

NCP Politics : राष्ट्रवादीची नवी यादी जाहीर; प्रवक्तेपदावरून डावललेल्या मिटकरींना पुन्हा बोलण्याचा अधिकार, ठोंबरेंना लांबच ठेवले

Ajit Pawar NCP Internal Dispute : 7 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी ही स्टार प्रचारकाची यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये अजित पवारांसह 40 जणांचा समावेश आहे.

Sudesh Mitkar

NCP News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात स्वतः अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि आजी-माजी आमदारांचा समावेश आहे. याच यादीत प्रवक्तेपदावरून वगळलेल्या आमदार अमोल मिटकरी यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी रुपाली पाटील ठोंबरे यांना मात्र प्रवक्तेपदानंतर स्टार प्रचारकांच्या यादीपासूनही लांब ठेवण्यात आले आहे.

चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची नवी यादी जाहीर करण्यात आली होती. यातून पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची नावे वगळण्यात आली होती. यादीमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रूपाली चाकणकर प्रवक्तेपदाचे देखील जबाबदारी देण्यात आली होती.

प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर रूपाली पाटील ठोंबरे यांनी निर्वाणीचा इशारा दिला होता. तसंच याबाबत अजित पवार यांच्याशी भेट घेऊन नंतर आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे देखील सांगितलं होतं. यानंतर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यामध्ये असताना रूपाली ठोंबरे पाटील या अजित पवार यांची भेटीसाठी केल्या होत्या.

मात्र काही कारणास्तव ही भेट होऊ शकली नाही तसेच अजित पवारांनी देखील हा आमच्या पक्षातील अंतर्गत वाद असून याबाबत मी रूपाली ठोंबरे यांच्याशी बोललो असल्याचे देखील सांगितले आहे. मात्र प्रदेश प्रवक्तेपदाच्या यादीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणखी एक यादी जाहीर करण्यात आली आहे.

7 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी ही स्टार प्रचारकाची यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये अजित पवारांसह 40 जणांचा समावेश आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा देखील समावेश पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे प्रवक्ते पदावर वर्णी न लागलेल्या अमोल मिटकरी यांना या यादीमध्ये स्टार प्रचारक म्हणून घेण्यात आलं आहे.

प्रवक्तेपदावरून डावलल्यानंतर या यादीच्या माध्यमातून अमोल मिटकरी यांना संधी दिली असल्याचं पाहायला मिळत आहे. मिटकरी यांना संधी देण्यात आली असली तरी रूपाली ठोंबरे यांच्याबाबत अद्याप तरी कोणताही सकारात्मक निर्णय पक्षांकडून घेतल्याचं पाहायला मिळत नाही. तसंच रूपाली ठोंबरे यांची अजित पवारांसोबत बैठक देखील झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर रूपाली ठोंबरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र करू इतर पक्षात जाणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत. त्यांना तीन पक्षांकडून ऑफर असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे आता रूपाली ठोंबरे या नेमक्या कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT