जुन्नर : जुन्नर तालुक्याचे आमदारपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अतुल बेनके यांची निवड झाल्याने पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब सदाकाळ यांच्या चेहऱ्यावरील दाढी गायब झाली आहे.अतुल बेनके हे आमदार व्हावेत यासठी गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी दाढी राखून विजयाचा पण केला होता.
बेनके आमदार झाल्यानंतर सदाकाळ यांनी आमदार बेनके यांच्या उपस्थितीत आपली दाढी काढून पण पूर्ण केला आहे.अशी आगळी वेगळी प्रतिज्ञा पूर्ण करणारा हा कार्यकर्ता माजी आमदार वल्लभ बेनके यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जात असून त्यांच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे काम केले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी केलेली प्रतिज्ञा निकालानंतर पुर्ण झाली आहे. मागील निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर यावेळी सदाकाळ यांच्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांनी दिलेली साथ मला विजयी करण्यात महत्वाची ठरली असल्याचे बेनके यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.