Pune News : पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. तसेच त्यांची कसबा मतदारसंघाचे 'किंगमेकर'म्हणून देखील ओळखले जात असत. बापट यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही बापट यांच्या निधनावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
खासदार गिरीश बापटांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून तीव्र दु:खं व्यक्त करण्यात येत आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही गिरीश बापटांना श्रध्दांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शरद पवार यांनी टि्वटमध्ये काय म्हटलंय ?
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट(Girish Bapat) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले.
त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दांत टि्वटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मनमिळाऊ स्वभावाचं नेतृत्व काळाच्या पडद्याआड...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. माझे लोकसभेतील सहकारी आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. ही बातमी अतिशय दुःखद आहे.
सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले. त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत सुळे यांनी शोक व्यक्त केला आहे.
जात, धर्म,पक्षभेदांच्या भिंती ओलांडून...
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार बापट यांच्या निधनावर भाष्य करताना म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे.
तसेच पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल,त्यांची आठवण कायम येत राहील अशा भावना पवारांनी व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहायलं जायचं असंही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.