Rupali Patil Sarkarnama
पुणे

Rupali Patil Thombare : रुपाली पाटील-ठोंबरे, अमोल मिटकरींची उचलबांगडी; प्रवक्तेपदावरून हटवलं, सततचे वाद भोवले!

NCP Rupali Patil Thombare & Amol Mitkari: सातत्याने आपल्या पक्षातील रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करणाऱ्या रुपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.

Roshan More

NCP News : मागील काही दिवसांपासून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर त्यांच्या पक्षातील प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे या टीका करत होत्या. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी केली होती. या वादासंदर्भात पक्षाने त्यांना नोटीस देत सात दिवसांत खुलासा करण्यास सांगितले होते. मात्र, सात दिवस होण्याची आधीच राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेत रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन प्रवक्त्यांच्या यादीमध्ये रुपाली ठोंबर यांना स्थान देण्यात आले नाही. तसेच अमोल मिटकरी यांना देखील प्रवक्तेपदाची पुन्हा संधी देण्यात आली नाही. त्यांचे देखील नाव या नवीन यादीमध्ये नाही.

पक्षाकडून नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी यांना स्थान देण्यात आले आहेत.

रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सूरज चव्हाण, विकास पासलकर, श्याम सनेर यांचा देखील प्रवक्त्यांच्या यादीमध्ये समावेश आहे.

रुपाली ठोंबरेंच्या निर्णयाकडे लक्ष

रुपाली ठोंबरे यांनी दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण आपली बाजू मांडल्याचे तसेच काही पुरावे दाखवल्याचे देखील सांगितले होते. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झाल्याने ते काय निर्णय घेणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT