Rupali Thomber Patil News in Marathi, Chandrakant Patil News, Rupali Thomber News sarkarnama
पुणे

रुपाली ठोंबरेंची बेताल बडबड ; मुंडके छाटण्याची भाषा, चंद्रकांत पाटलांवर निशाणा

भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे खासदार सुप्रिया ताई यांना मसनात जा म्हणाले खरं पण..

सरकारनामा ब्युरो

पुणे : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संताप व्यक्त केला होता. (Rupali Thomber latest new)

'तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसणात जा, पण शोध घ्या आणि आरक्षण द्या' अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. चंद्रकांतदादांच्या या विधानाचा समाचार राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thomber Patil) यांनी घेतला आहे.

रुपाली ठोंबरे यांनी फेसबूकवर एक चित्र शेअर केलं आहे. "भाजपचे अध्यक्ष ,आमदार चंद्रकांत पाटील हे खासदार सुप्रिया ताई यांना मसनात जा म्हणाले खरं पण मसनात असणारी स्त्री महाकालीच की चंपादादा, आणि ती तुमच्या सारख्या राक्षसी विचारांचे मुंडक छाटतेच. हे लक्षात ठेवा जय महाकाली," अशा शब्दात रुपाली ठोंबरे यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.

'तुम्ही कशाला राजकारणात राहता, घरी जा आणि स्वंयपाक करा, खासदार आहात ना तुम्ही ! कळत नाही का ? एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, कळत नाही का ?, एक शिष्टमंडळ पाठवायचे, आता घरी जाण्याची वेळ झाली आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली होती. त्या टिकेला सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनीही प्रत्युत्तर दिल आहे. त्यांनी याबाबत टि्वट केलं आहे.

"हे आहेत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष ! ते सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलत आहेत. मला नेहमीच वाटत होते, हे स्त्री द्वेषी आहेत. जिथे शक्य होईल तिथे महिलांचा अपमान करतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. ती गृहिणी आहे. ती आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातील इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे चंद्रकांत पाटील यांनी सर्वच महिलांचा अपमान केला आहे," असं टि्वट सदानंद सुळे यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT