MVA Politics Sarkarnama
पुणे

MVA Politics : विधानसभेच्या निवडणुका बेकायदेशीर; शरद पवारांच्या पक्षाचा दावा, विक्रमी याचिका दाखल

NCP SharadChandra Pawar Party Pune President Prashant Jagtap petitions MVA assembly elections 2024 : विधानसभा निवडणुका बेकायदेशीर झाल्याचा आरोप करत 'मविआ'कडून न्यायालयात 65 याचिका दाखल झाल्याचा दावा एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

Sudesh Mitkar

Pune News : विधानसभा निवडणुकीला 45 दिवस पूर्ण झाले आहेत. या निवडणुकीसंदर्भात काही आक्षेप असल्यास ते 45 दिवसाच्या आतमध्ये दाखल करणे आवश्यक असते. त्यानुसार महाविकास आघाडीकडून शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल 65 ते 70 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात या सर्वाधिक याचिका असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला आहे. तसेच कायद्यानुसार या निवडणुका बेकायदेशीर असल्याचं देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.

प्रशांत जगताप म्हणाले, "विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर निवडणूक आयोगाच्या संदर्भातील तक्रारीबाबत महाविकास आघाडीच्या (MVA) अनेक उमेदवारांनी याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंगळवारी याचिका दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये पुण्यातून मी राहुल कलाटे, रमेश बागवे, अश्विनी जगताप, अजित घावणे, दत्ता भैरट, अशोक पवार सर्वांनी याबाबतच्या याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केल्या आहेत".

छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातून बहुतांश उमेदवारांनी यासंदर्भात याचिका दाखल केल्या आहेत. नागपूर (Nagpur) खंडपीठाकडे देखील मोठी यादी याचिकांची झाली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच खूप मोठ्या प्रमाणात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या निवडणूक इतिहासामध्ये आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीनंतर एक ते दोन याचिका दाखल होत असत. मात्र यंदा 65 ते 70 याचिका दाखल झाल्या असल्याचा दावा प्रशांत जगताप यांनी केला आहे.

याचिकांमध्ये धर्माच्या जातीच्या नावाने मत मागणे, पैशाचं वाटप, मतदार यादीमधील घोळ, त्याचबरोबर उमेदवारांनी त्यांच्या दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये केलेला चुका, 'ईव्हीएम'मध्ये करण्यात आलेला घोळ या सर्व गोष्टींचा याचिकांमध्ये अंतर्भाव आहे.

घटनेच्या 61 (अ) कायद्यानुसार लोकसभेने आणि राज्यसभेने 'ईव्हीएम'चा संपूर्ण वापर करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही अथवा त्याबाबतचा कायदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या निवडणुकाच बेकायदेशीर आहेत, असा आमचा आक्षेप आहे. त्यामुळे या निवडणुकांचा पुनर्विचार व्हावा आणि पुढील निवडणुका या बॅलेट पेपर वरच घेण्यात याव्यात असा आमचा याचिका करण्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की न्यायदेवता याबाबतचा योग्य विचार करून आम्हाला न्याय द्यावा, असं जगताप यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT