Sharad Pawar attack on Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar: पवार आडनावापुढेच मतदान करा? अजितदादांना शरद पवारांचे थेट उत्तर; मुलगी ही वंशाचाच नव्हे तर..

Sharad Pawar Attack on Ajit Pawar: एका सभेत 'पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा,' असे आवाहन त्यांनी बारामतीकरांना केले. आडनावावरुन मतदानाचे आवाहन करणाऱ्या अजित पवारांना शरद पवार गटाने व्हिडिओ शेअर करीत खडेबोल सुनावले आहे.

Mangesh Mahale

Baramati News: पवार आडनाव असणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीमध्ये नुकतेच केले. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सडेतोड उत्तर दिले आहे. शरद पवारांचा (Sharad Pawar) जुना व्हिडिओ पोस्ट करीत आडनावावरुन मतदानाचे आवाहन करणाऱ्या अजित पवारांना बुरसटलेल्या विचारांचे म्हटले आहे.

महायुतीकडून बारामती लोकसभा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडण्यात आला आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या तुतारी चिन्हासह मैदानात उतरल्या आहेत.

बारामतीमध्ये नणंद-भावजय असा हा सामना रंगणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजितदादा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यांनी सभांचा धडाका लावला आहे. एका सभेत 'पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा,' असे आवाहन त्यांनी बारामतीकरांना केले. आडनावावरुन मतदानाचे आवाहन करणाऱ्या अजित पवारांना शरद पवार गटाने व्हिडिओ शेअर करीत खडेबोल सुनावले आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेलांनी यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) मुलाखत घेतली होती. त्यांचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने टि्वट केला आहे. 'मुलगी ही फक्त वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते, हे शरद पवारांचे विचार आहेत.

त्यामुळेच महाराष्ट्र हा देशातील इतर राज्यांपेक्षा वेगळा ठरतो. हे बुरसटलेल्या विचारधारेच्या आहारी गेलेल्यांना वंशाचा दिवा, आडनावाची फुशारकी, माहेरवास, सासुरवास ह्यात रमू दे, त्यांना प्रागतिक महाराष्ट्र कळलाच नाही ! , असा शब्दात अजित पवारांना डिवचलं आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

बारामती मतदारसंघातील दौऱ्यात अजित पवार म्हणाले होते की बारामतीकरांसमोर यंदा बाका प्रसंग निर्माण झाला आहे.बारामतीकरांनी आतापर्यंत पवारांना साथ दिली आहे. 1991 साली मुलाला म्हणजे अजित पवारांना निवडून दिले. त्यानंतर वडिलांना –म्हणजे शरद पवारांना विजयी केले. त्यानंतर तीन टर्म मुलीला – म्हणजेच सुप्रिया सुळेंना बारामतीकरांनी निवडून दिले. आता सुनेला संधी द्या. पवार आडनावापुढेच मतदान करा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT