Amol Kolhe Criticism on Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Video Amol Kolhe: अजितदादांचं 'पिंक पॉलिटिक्स' अन् कोल्हेंची फटकेबाजी; 'गुलाबी' पुंगी वाजवून योजनांच्या आवाज काढून...

Mangesh Mahale

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाची छाप पाहायला मिळत आहे. यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटातील शिरुर लोकसभेचे खासदार खासदार अमोल कोल्हे यांनी मिश्किलपणे टोलेबाजी करीत अजितदादांना (Ajit Pawar) चिमटा काढला आहे.

गुलाबी रंगाची पुंगी वाजवून जनतेला डोलविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा टोला कोल्हेंना लगावला आहे. पण ही जनता स्वाभिमानी आहे, असे ते म्हणाले. नागाचे दात काढून पुंगी वाजवून त्याला डोलायला लावून झाले आहे, आज नागपंचमीला गुलाबी रंगाची पुंगी वाजवून योजनांच्या आवाज काढून जनतेचा नाग डोलतो का हे बघण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा टोला कोल्हे (Amol Kolhe) यांनी लगावला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून दौरे,यात्रा सुररु आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसन्मान यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार महाराष्ट्रभर फिरत आहेत.

नाशिकच्या दिंडोरीतून अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे. सरकारी योजना सामान्यांपर्यंत नेण्यासाठीच नाशिकच्या पावन भूमीतून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनसन्मान यात्रा काढण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील महाराष्ट्र पिंजून काढण्याचं ठरवलं आहे. शरद पवार गटाकडून देखील आज शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सध्या 'गुलाबी'झाले आहेत. त्यांच्या जॅकेटपासून ते जनसन्मान यात्रेत वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा रंग देखील गुलाबी ठेवण्यात आला आहे. याच रंगावरुन सध्या राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही गुलाबी रंगावरुन अजित पवारांना डिवचलं आहे.आम्ही जनतेचे रंग घेऊन निघालो आहे, जनतेच्या विश्वासातील रंग आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी अजितदादांना टोला लगावला.

"राज्यात रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही आजपासून शिवस्वराज्य यात्रा सुरु करत आहोत. महायुती सरकारने सुरु केलेला गोंधळ दाखवण्याच काम ही यात्रा करेल. आमची यात्रा संपूर्ण राज्यभरात जाणार आहे," असे जयंतराव म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT