Rohit Pawar, Gopichand Padlkar, Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Rohit Pawar : "फडणवीस सेफ राहतात अन्...", पडळकरांचा उल्लेख करत रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar On BJP : "समाजकारण न करणाऱ्या नेत्यांवर काही बोलायचं नाही, गोपिचंद पडळकर चॉकलेट बॉय आहेत. देवेंद्र फडणवीसांनी काही नेते उभे केले आहेत. त्यामध्ये राणे, पडळकर, खोत आणि बार्शीचे राजेंद्र राऊत आहेत."

Jagdish Patil

Rohit Pawar On BJP : समाजकारण न करणाऱ्या नेत्यांवर काही बोलायचं नाही, गोपिचंद पडळकर चॉकलेट बॉय आहेत. देवेंद्र फडणवीसांनी काही नेते उभे केले आहेत. त्यामध्ये राणे, पडळकर, खोत आणि बार्शीचे राजेंद्र राऊत आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर पलटवार केला आहे.

राज्यात मराठा, ओबीसी आरक्षणाचा (Reservation) वाद सुरु असतानाच आता धनगर विरुद्ध आदिवासी असा वाद सुरु झाला आहे. याच आरक्षणाच्या वादासंदर्भात बोलताना "शरद पवारांमुळे पुरोगामी महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झाला आहे", अशी बोचरी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती.

त्यांच्या याच टीकेवर भाष्य करताना रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसह (Devendra Fadnavis) सदाभाऊ खोत, राजेंद्र राऊत आणि राणेंचा समाचार घेतला आहे. रोहित पवार म्हणाले, गोपिचंद पडळकर काय बोलले हे माहिती नाही, पण त्यांच्या डोक्यात भेसळ झाली आहे. समाजकारण न करणाऱ्या नेत्यांवर काही बोलायचं नाही.

फडणवीस चांगल्या बॉक्समध्ये

पडळकर हे चॉकलेट बॉय आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीसांनी उभं केलं आहे. त्यांच्यासह राणे, पडळकर, खोत आणि बार्शीचे राजेंद्र राऊत यांनाही फडणवीसांनी उभं केलं आहे. तर देवेंद्र फडणवीस हे चांगल्या बॉक्समध्ये असतात आणि ते बाकी लोकांना राजकीय उद्देशाने भुंकायला लावतात. यांच्यावर पोलिस ठाण्यात काय काय केसेस आहे ते बघा, अशा शब्दात रोहित यांनी पडळकरांवर हल्लाबोल केला.

दरम्यान, यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. गुंडगिरी, तलवारीने केक कापतात. गायकवाड पवित्र भूमीतून येतात गायकवाडांना लोकं लोकशाहीतून कापून काढतील. भाजप (BJP) घाबरली आहे, त्यामुळे दोन टप्प्यात निवडणूक घेत आहे. अजून घाबरले तर तीन टप्प्यात घेतील. मोदीसाहेब येणार इथे सभा घेतील.

मोदींनी जिथे सभा घेतली तिथं त्यांचे उमेदवार पडले आहेत, असा टोला लगावत दसरा झाला की निवडणूक लागेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली. 2014 साली धनगर समाजाला देवेंद्र फडणवीस खोटे बोलले होते. पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देवू असं ते म्हणाले होते. त्यानंतर किती कॅबिनेट झाल्या? निवडणूक झाल्या की तुम्हाला आठवत की अशी समिती करू तशी समिती करू, निवडणूक आली की तुम्ही लोकांना तिथं बसवता, असं म्हणत त्यांनी फडणवीसांवरही टीका केली.

जरांगे सामाजित काम करतात

तर यावेळी त्यांनी मनोज जरांगे हे सामाजिक काम करतात. सत्तेत असणारे लोक प्रत्येक कार्यकर्त्याला राजकीय दृष्टीतून बघतात. मात्र, राजकीय नेत्यांनी समजून घेतले पाहिजे की सगळं काही राजकीय हेतूने होतं नसतं, काही गोष्टी सामाजिक पण असतात, असंही रोहित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT