Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule: ‘बरं झालं पक्ष फुटला, राष्ट्रवादीच्या फुटीवर सुप्रियाताईं म्हणाल्या, 'अशा फालतू माणसाबरोबर...'

Supriya Sule Explosive Statement ON NCP Split: 'शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे,' असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

Mangesh Mahale

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसमोर पहिल्यांदा भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची रविवारी आढावा बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बरं झालं पक्ष फुटला. कारण एक तर ते तरी राहिले असते नाहीतर मी तरी राहिले असते. मी त्या पक्षात काम करु शकत नाही," असे सुळे म्हणाल्या.

"जो आपली बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो, अशा फालतू माणसाबरोबरच काम करणे शक्य नाही," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी टीकास्त्र डागले.

राज्यातील महायुतीच्या कारभारावर टीका करताना ‘ शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे,’ असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

'मी त्या पक्षात काम करू शकत नाही. हे सगळ्या दुनियेला माहीत आहे. माझी लढाई त्यांच्याबरोबर ते पक्षात असतानाही होती. मी हे कधी बाहेर बोलले नाही, पण संघटनेत आहे म्हणून बोलते, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता जोरदार निशाणा साधला.

राज्यातील महायुती सरकारच्या कारभारावचे वाभाडे सुळे यांनी काढले. ‘‘मतदारांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. हार-जीत सुरूच असते. शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्यांचे नाव आताच जाहीर करणे योग्य नाही. परंतु जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. हिम्मत असेल, तर समोर येऊ लढ. ही लढाई खूप मोठी आहे. छोट्यांना घेरण्यापेक्षा जे ‘डबल डेंजर’ आहेत, त्यांच्याशी लढण्यात मजा आहे,’ असे सुळे म्हणाल्या

एक तर तो पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करू शकणार नाही. तेव्हापासून लढाई सुरू झाली. मी आज पहिल्यांदाच ही गोष्ट बोलले. मी माईकवरही बोलेल. मी नाही कुणाला घाबरणार. मी असली फालतू लढाई करत नाही. मी विरोधी पक्षात आयुष्य घालवेल, पण नैतिकता सोडणार नाही, असे सुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT