Jayant Patil
Jayant Patil sarkarnama
पुणे

जयंत पाटलांनी अमोल कोल्हेंना केले सचिन वाझे अन् मोहिते पाटलांना परमबीरसिंग!

रोहिदास गाडगे

खेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन नेते सध्या तुरुंगात आहेत. राज्यचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. ही कारवाई चुकीची असून त्यांना अडकवण्यात आल्याचे राष्ट्रवादीकडून नियमीत सांगण्यात येते. मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांची परिवार संवाद यात्रा सुरु आहे. त्यामध्ये त्यांनी देशमुख कसे निर्दोश आहेत हे कार्यकर्त्यांना समजावून सांगितले.

नेहमीच वेगवेगळ्या अभिनेते म्हणून नियमीत वेगवेगळ्या भुमिका करत असताना चर्चेत असणारे शिरुर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) भेट सचिन वाझेच्या भूमिकेत उभे केले. जयंत पाटलांनी देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांचे स्पष्टीकरण देत असताना सचिन वाजेंच्या भुमिकेत कोल्हे यांना उभे केले. तर आमदार दिलीप मोहिते पाटलांना परमबीरसिंग आणि स्वत: अनिल देशमुखांच्या भुमिकेतुन भर सभेत स्पष्ट्रीकरण दिले.

जयंत पाटील चाकण येथील राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेनिमित्त पक्षीय आढावा बैठकीत देशमुख यांना खोट्या आरोपांमध्ये कसे अडवले याचे प्रात्यक्षिकच कार्यकर्त्यांना दाखवत होते. यावेळी जयंत पाटलांनी स्वत: अनिल देशमुख यांची भुमिका घेत मोहितेपाटलांना परमबीरसिंग यांची तर कोल्हेंना थेट सचिन वाझेच्या भुमिकेत उभे केले..!

यावेळी पाटील म्हणाले, दिलीप मोहिते पाटलांनी (परमबीरसिंग) यांनी कोल्हेंनी (सचिन वाझे) पोलिसांकडे पैसे मागितले. मात्र, प्रत्येक्षात पैशाचा आणि अनिल देशमुख (जयंत पाटील) वसुलीत काही संबध नसताना देशमुखांना अटक करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT