Ncp student wing and abvp
Ncp student wing and abvp 
पुणे

अभाविपच्या फलकाला राष्ट्रवादीने काळे फासले

सरकारनामा ब्यूरो

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या सदाशिव पेठेतील कार्यालयाच्या फलकास सोमवारी मध्यरात्री अनोळखी व्यक्तींनी काळे फासले. हे कृत्य राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसने केल्याचे संघटनेने मान्य केले आहे.

विश्रामबाग पोलिसांना खबर मिळाल्यानंतर संबंधित कार्यालयाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दिल्लीतील जेएनयुमधील विद्यार्थी व प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीचे संपूर्ण राज्यसह पुण्यात पडसाद उमटले होते. नाशिक येथे अभाविप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ऐकमेकांशी भिडले. पुण्यातही त्याचे पडसाद उमटले.

सोमवारी मध्यरात्री अभाविपच्या सदाशिव पेठेतील पेरुगेटजवळ असणाऱ्या सुविधा अपार्टमेंटमधील कार्यालयाचे फलकाला काळे फासण्यात आले. ही घटना मंगळवारी सकाळी निदर्शनास आली. अभाविपच्या गुंडगिरीचा निषेध करण्यासाठी हे कृत्य केल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसने म्हटले आहे. माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. 

सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचे हेच पुरोगामीत्व आहे का असा सवाल ही त्यांनी उपस्थित केलाय. राज्यातील या तिघाडी सरकारला सत्तेचा माज आलाय.  या प्रकाराचा समाचार आम्ही नक्कीच घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला
सत्तेत आलं की माज करायचा आणि सत्ता नसली की बिळात जाऊन बसायचं ही प्रवृत्ती राष्ट्रवादी पक्षाची असल्याची टीका त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT