Ajit Pawar sarkarnama
पुणे

पवारांची मोठी घोषणा; आगामी महापालिका, ZP निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचे धोरण ठरले!

NCP | Ajit Pawar : ओबीसी आरक्षणाची कसर भरुन निघणार?

सरकारनामा ब्युरो

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मोठा निर्णय घेतला असून त्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. ते काल पुण्यात (Pune) बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकूण जागांपैकी २७ टक्के जागांवर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील म्हणजेच (OBC) व्यक्तींना उमेदवारी देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

याशिवाय सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत ओबीसी समाजातील व्यक्तींना पूर्वीच्या प्रमाणात स्वतःहुन किमान २७ टक्के जागांवर उमेदवारी दिली पाहिजे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीसाठी रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणाची कसर भरून निघू शकेल, असेही मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी दिली तरी, नगराध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, सरपंच पदासाठीच्या आरक्षणापासून देखील या समाजाला वंचित राहावे लागणार आहे. याचे काय करायचे, असा सवाल यावेळी पवार यांना केला.

यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने अनेक प्रयत्न केले. यासाठी खास कायदा केला. पण सर्वोच्च न्यायालयाने या सर्वांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. मध्यप्रदेश सरकारनेही प्रयत्न केले. आता कर्नाटक सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT