<div class="paragraphs"><p>Dattatraya Bharane</p></div>

Dattatraya Bharane

 

sarkarnama

पुणे

शिंदेंचे टेन्शन गेले; अजित पवार, वळसे पाटलांनंतर जिल्हा बॅंकेवर बिनविरोध

मनोज कुंभार

वेल्हे (जि. पुणे) : पुणे जिल्हा बँकेच्या (Pune District Bank Election) संचालकपदी हवेली तालुक्यातील राष्ट्रवादीचे अनुसूचित जाती जमाती गटातून प्रविण शिंदे यांनी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांना पक्षातून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली होती, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या मतदारसंघातील खानापूर (ता. हवेली) येथील प्रविण शिंदे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघ समन्वयक म्हणून जबाबदारी आहे. तर महावितरण सदस्यपद व भारतीय रेल्वेचे सदस्य पद असताना त्यांच्या कार्यपद्धती मुळे ते परिचित आहेत. त्या मुळे त्यांना जिल्हा बँकेसाठी अनुसूचित जाती जमातीतून संचालक पदाची राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे तुळशीराम भोईर, चंद्रजित वाघमारे, सुरेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, आज (ता.१७) रोजी या तीनही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने प्रविण शिंदे यांच्या बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला.

बिनविरोध निवड झाल्यानंतर शिंदे यांचे बँकेच्या मुख्य कार्यालयात अभिनंदन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर, बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, खेडचे आमदार दिलीप मोहिते, आमदार अण्णा बनसोडे, आमदार अतुल बेनके, आमदार संजय जगताप, विलास लांडे, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. यावेळी प्रविण शिंदे म्हणाले, माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्ष निष्ठेचे फळ मिळाले. माझी जबाबदारी आणखी वाढली असून याचा उपयोग योग्य पध्दतीने समाज व पक्षवाढीसाठी करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT