Pune News: पुणे महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीतील तिन्ही मित्रपक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणामध्ये उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूक निकालानंतर पुन्हा युतीतील हे पक्ष एकत्र येतील अशी चर्चा असतानाच खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आम्हाला कोणाची गरज पडणार नाही. आमचा स्वबळावर महापौर होईल असं सांगितलं आहे. यानंतर शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याला उत्तर दिले आहे.
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, खूप प्रसन्न वाटतेय कारण पहिल्यांदा घराजवळच्या मतदार केंद्रामध्ये धनुष्यबाणावर मतदान करण्याची संधी मिळाली आहे. सध्या महापालिका निवडणुकांमध्ये इतर पक्ष अदृश्य आहेत, आमच्या दोघांमध्ये चुरस आहे असा दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेक ठिकाणी पैशाचा वापर होत असल्याचा देखील बोलले जात आहे त्याच्यावर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक निकालाबाबत काही अंदाज व्यक्त केला आहे. त्यामध्ये मुंबई येथे भाजपला 90 तर शिंदेच्या सेनेला 40 जागा मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे म्हणल्या, घोडा मैदान जवळ आहे. उद्या सगळं कळेल. मात्र मतदान होण्यापूर्वीच अशा प्रकारचे अंदाज वर्तवले जातात कारण इतर उमेदवार आणि मतदारांनी खचावे म्हणून असं केल जाते.
निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सोबत घेणार का? असं विचारलं असता आम्हाला कोणाची गरज पडणार नाही. स्वबळावर महापौर महापालिकेत बसू असं वक्तव्य खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मोहोळ आता बोलतात ते लोकसभे अगोदर बोलायला हवं होतं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर ते युतीधर्म विसरले आहेत. अहंकाराचा वारा त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे.
जो अहंकार चढलेला असतो त्याला काळच उत्तर देत असतो. त्यांनी अनेक ठिकाणी जी विधाने केली आहे. ही युती धर्माला शोभणारी नाही. युती म्हणून ज्या शिवसैनिकांनी लोकसभा आणि विधानसभेला काम केलं त्याला हरताळ फासणारी विधान मुरलीधर मोहोळ यांनी केला असल्याचा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला.
पुण्यामध्ये भाजपने आमच्यासोबत वरिष्ठांच्या सांगण्यावरून युतीची बोलणी केली. मात्र त्यांना युती करायची होती का? नाही ते आमच्या लक्षात आलं होत. कारण युतीच्या चर्चांमध्ये कोण उमेदवार असणात कोण नसणार हे तेच सांगत होते. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या घरात दोन उमेदवाऱ्या देण्यास मुरलीधर मोहोळ यांचा विरोध होता, असे देखील नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.