Pune Zilla Parishad
Pune Zilla Parishad 
पुणे

Pune Zilla परिषदेत नवे वॉररुम : होणार 'ही' महत्त्वाची कामे

अनुराधा धावडे

Pune Zilla Parishad पुणे : मुख्यमंत्री कार्यालयाच्या धर्तीवर पुणे जिल्हा परिषदेतही वॉररुम तयार करण्यात आले आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासह जिल्ह्यातील विकासकामे आणि पंचायत समितीतील कार्यालयीन कामाचे नियोजन करणे आणि कामांमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी या वॉररुमची स्थापना करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या पुढाकारानेच ही वॉररुम करण्यात आल्याची माहिती आहे.

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासकामांसाठी, योजनांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. त्यामुळे जिह्यातील त्या-त्या तालुक्यातीलं विकासकामांना आणखी गती देण्यासाठी वॉररुमचा उपयोग होईल. तसेच, कोणत्या तालुक्यात कोणत्या प्रकारची विकासकामे सुरु आहेत किंवा त्यात काही अडथळे आहेत, किंवा ते काम कोणत्या प्रमाणात प्रगतीपथावर आहे, याचा आढावा या वॉररुममधुनच घेणे शक्य होणार आहे.

याशिवाय निविदा प्रक्रिया राबवुनही ज्या ठिकाणी कामे सुरु झाली नाहीत, अशा ठिकाणी कामात काय अडचण आहे, हे कळण्यासही मदत होणार आहे. कामे वेळेत सुरु झाली नाही तर निधी तसाच पडून राहतो. त्यामुळे या सर्व कामांवर या वॉररुच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या कामांचे अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना दररोजचे कामांचे अपडेच द्यावे लागणार आहेत. इतकेच नव्हे तर पंचायत समितीच्या कार्यालयात फाईल कोणत्या कर्मचाऱ्याकडे किती दिवसांपासून प्रलंबित आहे आणि ती कोणाकडे जाणार आहे याचीही माहिती कळणार आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला खुलासाही द्यावा लागणार आहे.

नागरिकांनां आपल्या तक्रारी मांडण्यासाठी आधी जिल्हा परिषदेत यावे लागत होते. पण या वॉररुमच्या माध्यमातून नागरिकांना दररोज त्यांच्या समस्या तक्रारी मांडता येतील. त्यामुळे तातडीने त्यांच्या तक्रारींचे निवारण करणे शक्य होणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटलं आहे.

अतिरिक्त कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर या वॉररुमची जबाबदारी असेल. या वॉररुममुळे जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासह नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करता येणार आहे. मुख्यालय आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांमध्ये संवाद साधता येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT