PCMC Commissione Rajesh Patil & Uma Khapare News
PCMC Commissione Rajesh Patil & Uma Khapare News Sarkarnama
पुणे

नवनिर्वाचित आमदार उमा खापरे लागल्या कामाला, पिंपरी पालिका प्रशासनाला दिला इशारा

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रभागनिहाय मतदारयाद्या नुकत्याच जाहीर झाल्या. मात्र, त्या करताना राजकीय हस्तक्षेप झाला असून पालिकेच्या निवडणूक विभाग अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणे काम केल्याचा आरोप भाजपच्या (BJP) विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदार उमा खापरे (Uma Khapare) यांनी आज (ता.२७ जून) केला.

या याद्या बदलल्या नाहीत, तर विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील, (Commissioner Rajesh Patil) अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहाय्यक आयुक्त व पालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख बाळासाहेब खांडेकर यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव आणू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

२३ जूनला प्रसिद्ध केलेल्या या याद्या निर्दोष होण्यासाठी त्यावर १ जुलैपर्यंत प्रशासनाने हरकती व सुचना मागवल्या आहेत. पण, हा आठ दिवसांचा कालावधी खूप कमी असल्याचे सांगत ही मुदत तीस दिवसांची द्यावी, अशी मागणीही आमदार खापरेंनी केली आहे. दरम्यान, या यादीवर फक्त मतदारांनाच हरकती घेता येणार असून त्यातून या शेवटच्या टप्यावर आता नवीन मतदाराचे नाव समाविष्ट केले जाणार नसून ते वगळलेही जाणार नसल्याचे प्रशासनाने अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे फक्त मतदारयादीत नाव असूनही ते प्रभाग यादीत नसणे, ते दुसऱ्या प्रभागात जाणे अशाच चुकांची दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे मतदारयादीच बदलण्याची खापरेंची मागणी मान्य होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

मतदारयाद्या फोडताना प्रशासनाने प्रभागांच्या सीमांचा विचार केला नाही. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुकांनी त्यावर हरकती घेतल्याचा दावा खापरेंनी केला आहे. मतदारयाद्यांमध्ये झालेला हा राजकीय हस्तक्षेप आणि नियमबाह्यपणे केलेली उलथापालथ याबाबत कार्यवाही न केल्यास आणि मुदतवाढ न देता मतदारांच्या हक्कांवर गदा आणण्यांचा प्रयत्न केल्यास हक्कभंग आणेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. निवडणूक विभाग विशिष्ट लोकांच्या सांगण्यावरुन काम करीत असेल, तर ते लोकशाहीला मारक ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT