Gangster Nilesh Ghaywal sarkarnama
पुणे

Nilesh Ghaywal : निलेश घायवळचा आणखी एक कारनामा! इंदापूरच्या शेतकऱ्याची फसवणूक. स्कॉर्पिओचा नंबर दुचाकीला लावला अन्...

Nilesh Ghaywal Fraud Case : गुंड निलेश घायवळ प्रकरणी रोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. खोट्या कागदपत्रांच्या आधारे घायवळने पासपोर्ट काढून परदेशात पोबारा केला आहे. गुन्हेगारी कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या निलेश घायवळने एका शेतकऱ्याची देखील फसवणूक केली असल्याचं आता समोर आला आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 30 Sep : गुंड निलेश घायवळ प्रकरणी रोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. खोट्या कागदपत्रांच्या आधारे घायवळने पासपोर्ट काढून परदेशात पोबारा केला आहे. गुन्हेगारी कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या निलेश घायवळने एका शेतकऱ्याची देखील फसवणूक केली असल्याचं आता समोर आला आहे.

त्यामुळे या फसवणूक प्रकरणात कोथरुड पोलिसांनी गँगस्टर निलेश घायवळ याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. त्याने शेतकऱ्याच्या स्कॉर्पिओ गाडीचा नंबर प्लेट त्याच्या दुचाकीला लावून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

कोथरुड पोलिसांनी घायवळ याच्याकडून दोन स्कॉर्पिओ आणि दोन दुचाकी जप्त केल्या होत्या. यापैकी एका सुझुकी अ‍ॅक्सेस दुचाकीला शेतकऱ्याच्या गाडीचा नंबर लावल्याचे उघड झाले. या प्रकरणी सागर भाऊसाहेब बंडगर (वय 37, रा. भिगवण, ता. इंदापूर) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

बंडगर यांच्याकडे महिंद्र स्कॉर्पिओ गाडी असून, तिचा नंबर MH 12 XW 8955 आहे. पोलिसांनी निलेश घायवळ याच्याकडील दुचाकी जप्त केली असता, त्याचाही नंबर MH 12 XW 8955 असल्याचे आढळले. आरटीओकडे तपासणी केल्यानंतर हा नंबर बंडगर यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी बंडगर यांना बोलावून घेतले असता, त्यांनी गाडीची कागदपत्रे सादर करून निलेश घायवळ याने त्यांच्या गाडीचा नंबर वापरून फसवणूक केल्याचे सांगितले. यामुळे शासनाची आणि त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी नोंदवली.

कोथरुड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे. निलेश घायवळच्या या कृत्यांमुळे त्याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला असून पोलीस नंबर प्लेटच्या गैरवापरासह इतर बाबींचा तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT