Pune Police sarkarnama
पुणे

Pune Police : जिथं फायरिंग केली तिथंच धडा शिकवला : घायवळ टोळीची पोलिसांकडून धिंड; व्हिडिओ व्हायरल

Pune Police Action on Nilesh Ghaywal Gang: ज्या ठिकाणी निलेश घायवळ टोळीतील पाच जणांनी गोळीबार करून दहशत निर्माण केली होती त्याच भागातून आता पोलिसांनी त्यांची धिंड काढली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. काही दिवसापूर्वी आंदेकर टोळीनं आयुष कोमकर याची निर्दयीपणे हत्या केली. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच बुधवारी मध्यरात्री कोथरुड परिसरात गोळीबार झाल्याने खळबळ उडाली.

हा गोळीबार कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीकडून करण्यात आल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे घायवळ टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली होती. पु्ण्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पुणे पोलिसांनी टोळीतील सदस्यांना ताब्यात घेण्याचे सत्र सुरु केले आहे.

ज्या ठिकाणी निलेश घायवळ टोळीतील पाच जणांनी गोळीबार करून दहशत निर्माण केली होती त्याच भागातून आता पोलिसांनी त्यांची धिंड काढली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोथरूड परिसरात कुख्यात निलेश घायवळ टोळीच्या सदस्यांनी काही दिवसांपूर्वी साईड दिली नाही म्हणून प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होत्. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच दिवशी काही अंतरावरच सागर साठे नावाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला.

या दोन्ही घटनांमुळे घायवळ टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली होती. त्याला उत्तर म्हणून गुंड निलेश घायवळ यांच्या गुंडांची कोथरूड परिसरात पोलिसांनी धिंड काढली आहे. यात मयूर कुंबरे, मयक व्यास, गणेश राऊत, दिनेश फाटक, आनंद चादलेकर या पाचही जणांची पोलिसांनी धिंड काढली आहे.

दरम्यान दुसरीकडे शिवीगाळ का करतो, याची विचारणा केल्याने दोघा भावांवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करुन त्यांना जखमी करणाऱ्या व मोक्का कारवाई केलेल्या दोघांची येरवडा पोलिसांनी त्यांच्याच भागात चंद्रमानगर येथून कॉमरझोनपर्यंत धिंड काढली आहे..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT