Nitesh Rane Sarkarnama
पुणे

Nitesh Rane : नीतेश राणे म्हणाले, मोहोळ कुटुंबाला आधार देण्यासाठी आलोय

सरकारनामा ब्युरो

Pune Political News : शरद मोहोळ यांची हत्या करण्यात आल्याने संकटकाळात त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी मी आलो आहे. त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली असून येत्या काळात त्यांना मदत लागल्यास आपण त्यांच्या पाठीशी असल्याचे भाजप आमदार नीतेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

पुण्यातील कोथरुड परिसरातील शरद मोहोळ यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांची भेट घेऊन भाजप आमदार नीतेश राणे यांनी त्यांना धीर दिला. यावेळी आमदार राणे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कुठल्या कुटुंबावर संकट कोसळले तर मदत करणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे येत्या काळात आवश्यक ती मदत व सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासोबतच या प्रकरणाचा पोलिस योग्यरीतीने तपास करीत आहेत.

सरकार व प्रशासनाचे यावर लक्ष असून या प्रकरणाच्या संपूर्ण तपासानंतर सत्य लवकरच समोर येईल, असेही यावेळी आमदार राणे (Nitesh Rane) यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांचा तपास योग्य दिशेने

पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून भविष्यात टप्प्याटप्प्याने माहिती समोर येईल. मारेकऱ्यांन बाबत कुटुंबीयांकडे जी काही माहिती होती ती डिपार्टमेंटला पुरवण्यात आलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये जे काय सत्य आहे ते समोर येईल.

हिंदू समाजावर संकट आलं तर हे कुटुंब उभे राहिले आहे. त्यामुळे अशा कठीण प्रसंगात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे आमदार राणे यांनी स्पष्ट केले.

R...

SCROLL FOR NEXT