Chandrashekhar Bawankule News : NItin Gadkari : Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Chandrashekhar Bawankule News : गडकरी-फडणवीस मोठे नेते; मी तर त्यांच्यामधला ‘ॲक्सल’ ; ‘सरकारनामा’च्या मुलाखतीत बावनकुळेंची जोरदार ‘बॅटींग’

Chandrashekhar Bawankule Sarkarnama Interview : "गडकरींनी माझ्यासारख्या कार्यकर्याला पक्षात आणलं. मला नेता बनवलं.."

सरकारनामा ब्यूरो

Pune News : भारतीय जनता पार्टीत कोणताही गट नाही. आमचा पक्ष हा एक विचार आहे. नागपुरात देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी हे दोन मोठे नेते आहेत. त्या दोघांच्यामध्ये मी आहे. नागपुरात आम्ही तिघे घट्ट आहोत. फडणवीस व गडकरी दोन मोठी चाके आहेत तर मी त्यांच्यामधला ‘ॲक्सल’ आहे, या शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

‘सरकारनामा’च्यावतीने घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत बावनकुळे यांनी विविध विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. बावनकुळे हे नितीन गडकरी यांचे समर्थक मानले जातात. या संदर्भाने विचारलेल्या प्रश्‍नावर बावनकुळे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘ खरंतर एखादा नेता, एखाद्या कार्यकर्त्याला मोठा करतो. तेव्हा निश्चितपणे त्या कार्यकर्त्याला त्या नेत्याचं वलय असतं. गडकरींनी माझ्यासारख्या कार्यकर्याला पक्षात आणलं. मला नेता बनवलं, जिल्ह्याच्या राजकारणात आणलं, आमदार बनंवलं, त्यांनी आपली सावली आम्हाला दिली. नितीनजी आमचे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मोठे नेते तयार झाले, त्यांनी मला मंत्रिपदाची धुरा दिली. आम्ही कधीही गटातटात अडकलो नाही. आम्ही माणसांमध्ये राहतो, मिसळतो. खरंतर आम्ही पक्षीय विचारात अडकलो आहोत. नागपुरात गडकरी व फडणवीस मोठे नेते आहेत. त्या दोघांमधला मी ‘ॲक्सल’ आहे.’’

मतदान करणाऱ्या एकुण मतदारांपैकी ५१ टक्के लोकांचा पाठिंबा मिळविण्याचे पक्षाचे धोरण असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. ज्या पद्धतीने आमच्या पक्षाची यंत्रणा काम करीत आहे. त्यानुसार हे ‘टार्गेट’ अशक्य नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले. राज्य आणि केंद्रातील सरकार जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे. लोकांच्या हिताची अनेक कामं होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका मोठ्या ताकदीने आणि केलेल्या कामाचा जोरावर लढवणार आहोत. त्यामुळे ५१ टक्केंच ‘टार्गेट’ अवघड नाही, असा विश्‍वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

राज्यात २०१९ च्या लोकसभेप्रमाणे यश मिळवायचं असेल तर सोबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असायला हवेत. अशी विचारधारा भाजपात आहे का? या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, ''अशा कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा विचारधारा पक्षात नाही. मी आपल्याला एक हजार टक्के सांगतो, अशी कोणाचीही विचारधारा नाही. असा विचार कुणाच्याही मनात नाही आणि येणारही नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने येत्या सर्वच निवडणुकांत उतरणार आहे. केंद्र व राज्यातील सरकारने केलेल्या विकास कामांच्या जोरावर आम्ही मोठ्या फरकाने सत्तेत येऊ असा विश्‍वास बावकुळे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT