Nitin Gadkari
Nitin Gadkari sarkarnama
पुणे

..म्हणून मी सगळ्या मंत्र्यांचे हॉर्न बंद केले : गडकरी

सरकारनामा ब्युरो

पुणे : भारतीय वाद्यांचे हॉर्न वाहनांना बसवण्याची कल्पना यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली होती. अॅम्बुलन्स सायरनचा आवाज बदलणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हणाले. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाच्या भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मंत्र्यांचे हार्न का बंद केलं याविषयी गडकरी यांनी आजच्या कार्यक्रमात सांगितले. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रुग्णवाहिकेसाठीही धून शोधली आहे. वाढत्या प्रदूषणावर उतारा म्हणून अ‍ॅम्ब्युलन्सवर आकाशवाणीची धून बसवण्याचा पर्याय गडकरींनी सुचवला.

उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनिल टिंगरे, महापौर मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सभागृहनेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रमकुमार आदी उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले, “सायरन अन् सलामी हे मंत्र्यासाठी आकर्षणाचे विषय आहेत, मंत्रिपद गेल्यावर हे सोबत राहत नाही. देशात सर्वात जास्त आवाजाचं प्रदूषण पुणे शहरात आहे, अजितदादा हे प्रदूषण थांबवा” “तीन चार महिन्यात मी ऑर्डर काढतोय, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज पासून सगळ्यांना, इथून पुढे सगळ्या गाड्यांना फ्लेक्स इंजिनच असलं पाहिजे, पुण्याला प्रदूषणापासून मुक्ती देण्यासाठी इथेनॉलला परवानगी द्या, केंद्रातून सर्व मदत मी करतो”

''पुण्यात येताना खुप दुःख होतं. पुर्वी माझी बहीण पुण्यात स्वारगेटला राहत होती. तेव्हा मी पुण्यात यायचो तेव्हाची हवा शुद्ध होती. आताचे पुणे प्रदूषित झालं आहे. जल, वायू आणि ध्वनी याबाबत इंटरनॅशनल बेंचमार्क आहेत. त्याचे पालन करुन सगळ्या मंत्र्यांचे हॉर्न बंद केले. लाल दिवे काढले, मी रोज सकाळी उठतो काही दिवसांनी मला लक्षात आलं की ध्वनी प्रदूषणामुळे खूप त्रास होत आहे. त्यामुळे आता ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मी ऑर्डर काढून क्लासिक संगीताची ट्यून अँम्ब्युलन्सवर लावणार आहे. ते कानाला ऐकायला चांगल वाटेल तसेच गाड्यांचे हॉर्नदेखील कर्कश आहेत त्यामुळे त्यांचाही आवाज बदलणार आहे. जर्मन व्हायोलिनवादक होता, त्याने आकाशवाणीची ट्यून तयार केली होती, मी ती ट्यून शोधली, आता अ‍ॅम्ब्युलन्सवर ती लावणार, कानाला चांगलं वाटतं” असे गडकरी म्हणाले.

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT