Ajir Pawar | Shrirang Barne  Sarlamrm
पुणे

Shrirang Barne on Maval Loksabha: समोर कुणीही असला तरी मावळ लोकसभा मीच जिंकणार: खासदार बारणेंचे पवारांना खुले आव्हान

Maval Loksabha Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाबाबत निर्णय घेतला आहे

सरकारनामा ब्यूरो

Shrirang Barne on Maval Loksabha : समोर कोण आहे, हे पाहून मी कधीच निवडणूक लढवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कितीही ताकद लावली तरी, २०२४ मध्ये शिवसेना-भाजपचा उमेदवार म्हणून मावळ लोकसभा मतदार संघातून मीच जिंकणार, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne) यांनी व्यक्त केला. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावही जोरदार टीका केली.

यावेळी बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले, देशभरातील सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तरी 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा केंद्रात भाजपचे सरकार येणार आहे.२०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत.हे सगळे पक्ष एकत्र आले तरी त्यांचा विचार जुळत नाहीत. ते प्रत्येकवेळी पाय ओढण्याचेच काम करत आहेत. गेले इतके वर्षे मी ज्यांच्यासोबत काम केलं, ते मेहबुबा मुफ्तींसोबत जाऊन बसले. हे दुर्दैवी आहे.

हिंदुत्त्वाचा खरा वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. ते राज्यात अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत, त्यांचा विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असंही यावेळी खासदार बारणे यांनी सांगितलं. 2024 च्या निवडणुकीबाबत बोलताना बारणे म्हणाले, 2024 च्या निवडणुकीत आणखी बरीच स्थित्यंतरे होतील. विकासाच्या मुद्द्यावर 2024 ची निवडणूक होईल आणि या निवडणुकीत ही जनता विकासाला महत्त्व देईल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जागावाटपाबाबत निर्णय घेतला आहे. पुढच्या काळात ते निर्णय जाहीर करतील, सन्मानाने जागावाटप होईल, असही श्रीरंग बारणे यांनी म्हटलं आहे.मावळ लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मी 2 लाख 53 हजार मतांनी पराभव केला. 2014 असेल 2019 असेल मी समोर कोण आहे हे बघितलं नाही. समोर कोण आहे याची मला चिंता नाही. मी जनतेतून काम करुन मावळ मतदारसंघात वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीतही मावळ मतदारसंघातून मी विजयी होईल, असा विश्वास बारणेंनी यावेळी व्यक्त केला.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT