police bandobast.jpg
police bandobast.jpg 
पुणे

IPS नव्हे तर पोलिस काॅन्स्टेबलमध्येही बदल्यांवरून नाराजी

पांडुरंग सरोदे

पुणे : पुण्यात नव्याने आलेले पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दोन दिवसांपुर्वी साडे बाराशे पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले होते. मात्र त्यामध्ये मुदतपूर्व बदली झालेल्या काही नाराज पोलिस कर्मचाऱ्यांनी सोमवारी पोलिस आयुक्तांकडेच दाद गर्दी केली. 

पोलिस खात्यातील बदल्या या नेहमीच चर्चेच्या ठरतात. मध्यंतरी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून राजकारण झाले होते. तेव्हाही असाच काहीसा नाराजीचा सूर उमटला होता. आता पुण्यातील काही काॅन्स्टेबल्सनी आपल्या बदलीवरून आयुक्तांना साकडे घातले आहे. 

पोलिस ठाणे, पोलिस मुख्यालय, पोलिस आयुक्तालय व अन्य विभागांमध्ये सहा वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरी करणाऱ्या पोलिसांची, तसेच विनंती अर्ज व ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत, अशा पोलिसांच्या पोलिस प्रशासनाकडून सातत्याने बदल्या केल्या जातात. गुप्ता यांनी पोलिस आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर साडे बाराशे पोलिसांच्या बदल्यांचा आदेश शनिवारी काढला. त्यामध्ये तिन्ही प्रकारच्या पोलिसांचा समावेश होता. मात्र त्यामध्ये सहा वर्षे पूर्ण न झालेल्या पोलिसांचीही बदली करण्यात आली. त्यामुळे संबंधीत पोलिसांमध्ये नाराजीची भावना होती. 

रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी सकाळपासूनच मुदतपुर्व बदली झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी पोलिस आयुक्तालयामध्ये गर्दी केली. अचानक 50 ते 100 पोलिस एकत्र आल्याने आयुक्तालयामध्ये गोंधळ उडाला. 

दरम्यान, पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी संबंधीत पोलिसांचे म्हणणे एकुन घेतले. याविषयी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, "नियमानुसारच बदल्या केलेल्या आहेत. त्यापैकी काही जण नाराज असणार आहेत. काहीचे "डिफॉल्ट रिपोर्ट" नुसार बदली झाली आहे. ज्या पोलिसांचे खरेच महत्वाचे कारण आहे, त्यांचा विचार केला जाईल. त्यासाठी एक समिती काम करत आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT